बरसणारा तो दूरेक्ष
शब्द-पाऊस...
मुग्ध करतो
प्रलुब्ध गुंजारवा ने...
कानपाती ओथंबलेल्या..
मन मात्र....
चिंब चिंब भिजवतो...
सतत वाटते...
थांबू नये कधीच...
हा तुझ्या मन-निखळ...
शब्दांचा पाऊस.
तत्क्षणी...
अंधारुनी प्रगटतो...
कोसळणारा हा दृश्य आभाळ-पाऊस...
सर्वार्थे त्रेधातिरपिट उडवतो टपो-या थेंबांनी...
मौक्तिक अंग लपवू किती....
ह्या मस्तवाल आभाळी पावसांत...
खरंच आज आत्ता....
नाही तु ....
मज साथीला....
नेहमी नखशिखांत चिंब....
फक्त स्वत:च भिजणारा...
आणि माझं मलाच नेहमी
कोरडं ठेवणारा...
रेनकोट...!
-सुनील पंडित
You have a beautiful mind...
ReplyDeleteखूपच सुंदर!
ReplyDeleteरोमांचित करणारी कविता..
शुभेच्छा!👍👍💐💐
Thank you Madam....
DeleteSir nice poem
ReplyDeleteनमस्कार पंडित सर ,मनात कोसळणाऱ्या शब्द पावसाची कल्पना खूप वेगळी आणि सुंदर आहे. कारण त्या पावसातून कोणताही रेनकोट तुम्हाला कोरडं राखू शकत नाही. पण आभाळातील जलवर्षाव तसा नाही नां या भावना छान व्यक्त झाल्या आहेत. एक सूचना करतो. कृपया राग मानू नये ही विनंती. काही दुर्बोध शब्दांऐवजी सोपे सुटसुटीत शब्द कवितेच्या अशा विषयांना अधिक सौंदर्य देतात. कारण विषय तरल आहे. लिहिते राहा सर. शुभेच्छा.
ReplyDeleteThank you Sir ji...
ReplyDeleteनितांत सुंदर विचार आणि काव्य! चपखल शब्द योजना. छान अनुभव. सर ही तर तुमची नवी ओळख.लिहिते रहा..शुभेच्छा!
ReplyDeleteThank you very much for your appreciation Dr. Prakash ji Chaudhari Sir.
DeleteYour encouragement will boost my poetic vision.... Thanks again.