Labels

Monday, August 31, 2020

चांद्रणी










लुकलुकणाऱ्या चांदणीने

शीतल चंद्राला आमंत्रिले,

ये,......ये ना माझ्या अंगणी.

तो शशीचंद्र घायाळ मनी..

डोळे मिटुनी नखशिखांत शहारला...!

लुकलुकणाऱ्या रत तेजाने,

शीतलता हवीहवीशी स्पर्शिली...

अनुरागी मदनमोहिनी चांद्रणी

प्रेमानं धूंद पुर्णबिंब अनुकर्षिली....!


काही क्षणातच....

काळ्याकुट्ट क्रूर मेघाने....

चांद्रणी लपवली..झाकोळली.

अस्तित्व तिचं विरून गेले...

विसरून गेले त्या काळभानात.

चंद्रमोहक चंद्रमौळी चांद्रणी

चंपाकली मुसमुसत स्पुदंली.

ढगाने आता एकला मार्ग आक्रमिला,

काळोखात मगरुर लपून गडगडाटी 

हसत नभी दुमदूमत राहिला.

-सुनील पंडित


3 comments:

  1. सुंदर कल्पकता!😊💐💐

    ReplyDelete
  2. खूप सुंदर कल्पना. प्रेमीजनांना अनादि काळापासून अकल्पित संकटांना सामोरं जावं लागतं. पण त्याआधी ते प्रेमवर्षावात चिंब भिजण्याचं सुख अनुभवतात. छान रचना.
    --रामदासी पु. रा.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS