Labels

Monday, August 24, 2020

Pen-बंधन

बंधन घालता पेनाला दोरीचे...

कसा निसटेल तो कोठे?

वाटेल तेंव्हा त्या पेनाला

हात सरसावूनी.. तुम्हीं कागदावर ओढा....!

जादूई शब्द मनातले...

लाडकी कविता बनुनी,

धरून ठेविल त्या 'पेनाला'...!

हृदयातील गाणे तुमच्या...

उमजेल निरागस कागदाला...!

रिफील-शाई न संपणार कधी ह्या 'पेनाची'...

मग दुसरा 'पेन' कशी..अन कधी घेईल तुझी जागा?

Pen नसतो फक्त देण्यासाठीच 'pain'.

दोर-बंधन देई झुगारूनी तो,

लुटण्यासाठी सहजीवनानंद...!

आता प्रश्न पडे कागदाला,

कसा रे बंधक 'पेना'...

भूललास तु मम बाह्य-रुपाला...

तसा तर मी एक कोरा कागद...

झालो पुरता काळानिळा...

ओळखता तुझ्या प्रवाही अंतर्मनाला..

अगदी न जाणता ...न समजता...!

-सुनील पंडित.

13 comments:

  1. खूप छान सर , कुठल्याही पोस्ट ऑफिस मधे किंवा इतरत्र दिसणारे पेन तुम्ही कवितेच्या दोरीने छान बांधले. संवेदनशील मनालाच साध्या साध्या गोष्टी मधे मोठे अर्थ सापडतात.
    रामदासी पुरुषोत्तम रा.

    ReplyDelete
  2. Sunil ji खूपच परफेक्ट शब्दात पकडलं पेनाला.

    ReplyDelete
  3. खुपच छान कविता आहे सर

    ReplyDelete
  4. सजीव चित्रण!😊

    ReplyDelete
  5. Kavita vachun evdhech udgar nighale wah..mustach.👌👌👍

    ReplyDelete
  6. वाह, हे भारी आहे
    आपल्या नित्य वापरातील प्रत्येक गोष्टींमध्ये सुद्धा संवेदना असते फक्त त्यांना योग्य पद्धतीने हाताळणे, दखल घेतली जाणे...भलेही त्या निर्जीव का असेनात.
    तीच गोष्ट चालत्या बोलत्या माणसांसाठी/जीवांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची...दखल घेतली गेल्यामुळे स्वतःबद्दलचा विश्वास वाढतोच, पण एखादे कार्य जोमाने करण्यासाठीचा उत्साहसुद्धा वाढीस लागतो.
    आणि अशी दखल घेतली जाणे किंवा जाणीव ठेवणे हे आपल्या सारख्या सुहृद्य व्यक्तिमत्वालाचं साध्य आहे.

    ReplyDelete
  7. धन्यवाद वैभवजी....आपलाही पेन अप्रतिम लिहितोय.

    ReplyDelete
  8. वाव! खुप छानच कविता.एक दोरीने बांधलेला पेन पण खुप छान भावविश्व ऊभे केले.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर
    या लेखणीला खूप संवेदनशील मन आणि कल्पना शक्ती प्रचंड पाहिजे
    खूप छान

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS