Labels

Saturday, August 1, 2020

TAG-S-TORY : 2

कडकडीत तापलेल्या तेलात तिने भजी कौशल्याने सोडली, तशी चुरचुरीत आवाजात भजी आकाराला येवु लागली. सुवास दरवळला...आज दुपारी त्याने तिच्या लांबसडक काळ्याभोर केसात गजरा माळला होता व त्यातील एक फूल आता तिच्या ढळणा-या बटेत अडकलं. तिनं त्वरेने मान उंचावली....तशी ती ढळणारी केसांची बट मागे सरकली. तिनं समोर पाहिलं,...अंगणातील झाडावर एका कोकिळेेेने आपली अंडी सवयी प्रमाणे कावळ्याच्या  घरट्यात सफाईने मिसळली. कावळ्याने स्वत:ची अंडी बाहेर फेकुन दिली व कोकिळेच्या अंड्यांना उबवू लागला.
-सुनील पंडित

3 comments:

  1. माणसाच्या जीवनात सहज संदेश देणारी गोष्ट! सुंदर सर!

    ReplyDelete
  2. Short but sweet.. Makes one visualise,while reading..that's the real writing skill. Great. Keep writing

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS