Labels

Saturday, August 29, 2020

TAG-S-TORY : 6

अथांग पसरलेल्या निळ्याशार जलाशयाच्या विस्तिर्ण क्षितीजाहून अचानकपणे "त्याची"  भाव दृष्टि... मरगळलेल्या त्या शहराच्या चिमुकल्या क्षितीज-बिंदूवर वळली. खिन्नता मनात होतीच.. पण आश्चर्य नाही वाटलं. ना मिरवणूक....,ना धिंगाणा.....गर्दी तर अजिबात नाही... संपूर्ण "लोकमान्य" मार्ग शांत होता .. निर्विकार अन् निर्मनुष्य सुद्धा. घरे मात्र फुलली होती भाबडेपणामध्ये...' सॅनिटायझर व मास्कच्या विळख्यात...! "मानमोड्या" मोबाइलस्क्रीन चमकवत...!क्षणार्धात "बा" निघाला... थेट शिवपार्वतीकडे...  पाण्यात झेपावणार तर तेवढ्यात दूर अंतराहून त्यांच्या कानावर एक केविलवाणी आरोळी पडली.....

पुढच्या.....ß..ß....ß....वर्षी लवकर या..!!! 

-सुनील पंडित.

5 comments:

Blog Canvas

GOD'S SMS