Labels

Monday, November 9, 2020

रीचार्ज... सर्वांचा !!

एक प्रश्न कधीकधी सतावतो.

गुलाम कोण आहे कुणाचा?

तो..जर सगळं काही करतो,

तर मी आहे काय कामाचा?


त्याचं नसणं अगदीच अमान्य,

जगणं एकट्याने सुद्धा अशक्य.

चार्ज-रीचार्ज करावे लागतात.

नेहमीसारखे आपोआप होतात. 


स्पर्श केला तर तो चमकतो,

नाही तर मूक पडुन असतो.

मनपसंत गोड गाणी ऐकवतो, 

छान व्हिडिओ,सिनेमा दर्शवतो.


क्लिक सेव्ह डिलीट लीलया करतो.

ओटीपी वर क्विक व्यवहार करतो.

एटीएमचा खरा पीन लगोलग देतो.

ऑनलाईन तर खुप कमाल करतो.


काॅलची मोहक ट्यून ऐकवतो,

बोलणं माझं युंही पोहोचवतो.

संदेश माझे तत्परतेने आणतो,

निरोप पटकन पोहोच करतो. 


दिसतो काहीसा भोळा भाबडा,

हुशारीमध्ये वाटतो कमी थोडा,

सगळे म्हणतात त्याला स्मार्ट.

समजत नाही मला त्याची आर्ट.


चौकशी असते त्याची खुपच जास्त.

मेमरीचा माझ्या..मात्र होतोय अस्त. 

नंबर त्याचा फक्त साधा दहा अंकी  

सांगणे अवघड,एका दमात नक्की.


सदा सर्वदा गुणसंपन्न साथीला,

प्रश्न तरी का पडावा जगाला..

एकमेकांचे आम्ही आहोत कोण?

येईल का उत्तर देणारा फोन?

-सुनील पंडित


24 comments:

  1. फारच मस्त!😊👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम..🌷🌷🌷

      Delete
  2. खुप छान, अप्रतिम काव्य.सर असेच लिहीत रहा.👌👌👌👌👌👆
    बनकर सर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर... शुभेच्छा.

      Delete
  3. Your contemporary poem recharged our mobile minds hence responding back with feed back with the same SMART companion of all of us.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much Sir ji..for rechargeable comment on the smart secret of mind.

      Delete
  4. वा...झकास. चालू काळाला चपखल विषय निवडून योग्य शब्दांत मांडलीय रचना. छान पंडित सर. तुमची लेखणी सगळीकडं डोकावतेय. कौतुकास्पद.
    --- पु. रा. रामदासी.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद सर... रचना व शब्द लेखणीतून सर्वदर्शी बनताहेत.. आपल्या शुभार्शिवादासाठी.

      Delete
  5. Very nice poem sir, specially the first 4 lines "gulam kon aahe konacha" ... So perfect for this smart phone era

    ReplyDelete
  6. How true.. Mobiles have becomes indispensable in our lives.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS