बघतो आठवणींची दिवाळी
अंगणात घालता रांगोळी
चमके दीपज्योती पिवळी
वाहूनी गणेशा दुर्वाहरळी.
आठवे बालपणीची दिवाळी
घुमणारी गोलगोल रोवळी
फणसाची अतरंगी अठळी
भन्नाट तुझीमाझी गूपचिळी.
रूंजी अनुभवणारी दिवाळी
दिनकराची ई-कृपा कोवळी
अल्लड लोभस नव्हाळी
भिरभिरती नजर बावळी.
सजली आवडणारी दिवाळी
गीतमैफल लवकर सकाळी
गोड-खमंग लयलूट फराळी
गवसते सांज प्रसन्न सावळी.
सर्वांना भुलवणारी दिवाळी
लटपटणारी ती चेंडूफळी
करामती उखाळी पाखाळी
दिवा झडपणारी पाकोळी.
आली बदलणारी दिवाळी
नाते शुभ्र चुन्याची निवळी
स्वभाव पर्जन्यजल पागोळी
ते दिन आणि दीन दिवाळी
नको झाली का मांदियाळी ?
-सुनील पंडित.
One cannot resist but recall Diwali festival celebrated at every phase of lifetime.You are blessed poet.
ReplyDeleteChhan chhan DIPAWALI 👌👌
ReplyDeleteदिवाळीच्या आठवणी, सुखद स्मृती!😊
ReplyDeleteMast! Happy Deepawali to you and your family
ReplyDeleteDin & Deen Diwali.... indeed! Well thought of...
ReplyDeleteAprartim!
ReplyDeleteGreat canvass of memories reflected in this nice poem Sir! Happy Diwali!
ReplyDeleteNostalgic.. A throwback to childhood times,beautiful memories lives for ever.
ReplyDelete