धावपळ..धडपड....
तुझी माझी..सर्वांची,
जीवन अधिक सुलभ
अन् सुंदर करण्याची.
स्वप्न ध्यानी आणि मनी
जिद्द.. सर्व कमावण्याची.
काळ क्षण तन मनं बदलली.
आणि गमावली उर्मी
मनमोकळा श्वास घेण्याची..!
विवेक विचार हरपला.
ओलावा निमूट सुकला.
संपन्न नितळ नात्यांचा.
संवाद मोबाईल झाला.
भान सुटले सदा भोळा
तारतम्य नाही कानीडोळा.
जीवन गढूळ ..एकोपा गेला...
ओठ शब्दच विसरले.
बोल विरत विरत गेले.
सतत कनेक्टेड तु आणि मी,
कुठेही कुणी कुणांचच नसतं,
इंटरनेट महाजालावर..वेग वेडं
काहीही....सहज आणि,
सहन होण्याच्या पलीकडचं घडतं.
हॅकर्स सावज हेरतात.
ॲप्स महागात पडतात.
साईटस् चक्क लुटतात.
भावना मात्र शुन्य बनतात.
स्वप्नी छंदीफंदी जीवन
वेग सुद्धा अचंबित झाला.
विषाणू युद्धास आला.
शिरली कुरुपता अंगी
मुखपट्टी बनली ढाल
भयभिती तलवार म्यान
घर-बंदी बनून राहिले.
करंट्या तुटलेपणाने
अवघे विश्व सुन्न झाले !!!
नको विसंवादी तार,
नको आभासी मनोरा..
नको बोथट संवेदना,
जपणे दैवी नंदनवना
खरा मानव धर्म जाणा.
आवाज माझा मधुर खरा,
सुर तुझा सजव शुरा,
हार्मोनियम फुलव बरा,
संवादी सुर लाव जरा.
घेवुनी कणखर सुकाणू
मार्ग शोधू विज्ञान जाणू
समृद्ध संपन्न तु जिवाणु..
हटवू.. संपवू तो विषाणू.
शिवं सुंदरम...जगासाठी,
तुझ्यासाठी...माझ्यासाठी.
-सुनील पंडित, पुणे.
सर्वांच्या मनातील भावना..खूप मार्मिक!
ReplyDeleteधन्यवाद मॅडम...
DeleteNice One Kaka ...!!!
ReplyDeleteThanks Mayur 🌷
Deleteअप्रतिम सर
ReplyDeleteधन्यवाद 🌷
Deleteअत्यंत भावनिक कविता ,सर 🙏
ReplyDeleteधन्यवाद 🌷
DeleteVery true, sir. Well said!
ReplyDeleteThank you.
Thanks Mm... encouraging words do bring wonder.
DeleteSir, Classic poem touched to heart.
ReplyDeleteWholeheartedly thanks.
Deleteखुपच सुंदर सर जी
ReplyDeleteखुपच सुंदर सर
ReplyDeleteYour poem shows a ray of hope to be determined to live happily in crucial situations faced by all of us.
ReplyDeleteThank you very much... situation does show a path to lead forward with hope.
Deleteव्वा... तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन वेगवान आयुष्य जगताना आपण काय काय गमावतोय आणि कोणकोणत्या संकटांना आमंत्रण देतोय हे थोडक्या शब्दांत खूप छान मांडलंय तुम्ही ! Keep it up !!
ReplyDelete-- पु. रा. रामदासी.
होय सर जी... वेगवान आयुष्य व त्या अनुषंगाने येणारे परिणामकारक अनुभव वेगळीच अनुभूती देत आहेत.
DeleteSir nice
ReplyDeleteIt's very true situation.nice
ReplyDeleteVery touching poem well written,relatable to the situation.
ReplyDeleteThank you very much Al.. Situations do touch and reflect every sphere of life.
DeleteTruly representative of the general sentiment!! Very well expressed!!
ReplyDeleteOhh thanks a lot...
DeleteKhupach chhan Sir...aapulkicha olava sampat aslyachi khant....ekdam rast shabdat vykt keli aahe...shevatahi aashadayi aahe..👌
ReplyDeleteThank you very much.
DeleteIts important to be connected mentally.....just not verbally.
ReplyDeleteYes..it does happen and also propeles to boost morale psychologically.
DeleteKhup sundar, vastav satya chhan kavya panktit utaravlay. -DG
ReplyDeleteThank you very much.
DeleteNice
ReplyDeleteTruly contemporary.... highly associative....
ReplyDelete