दिवाळीत तिचं घर लख्ख उजळून निघाले. लुकलकणारी, मनोहारी रंगाची प्रवाही विद्युत रोषणाई प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. स्वागतासाठी लखलखता लालसर सोनेरी आकाश कंदील लटक्या झिरमिळ्या हलवत हुंकार द्यायचा.. तिची नजर मात्र आकाशातील आवडता तारा शोधत होती. आपल्या नजाकतीने, मोहमयी चकचकीत आरसा अधिकच खुलला.आज सगळेच त्यांच्यासमोर येताच जादुईरित्या विरघळून जात होते. तिने आरश्यात पाहीले व उस्फूर्त आवाज आला, "सखे,तु खुप प्रेमळ आहेस, पृथ्वीतलाचे सौंदर्य आहेस. तु माझ्या हृदयात आहेस.तुझे प्रतिबिंब मी कसे दाखवू! ते फक्त माझे आहे". त्याच क्षणाला आकाशात एखादा तारा तुटावा, असा फटाक्यासारखा मोठा आवाज झाला. आणि आरसा खळकन.....तुकडे-तुकडे होऊन खाली पडला.
-सुनील पंडित
TAG-S-TORY : 17
Her house was fully lit up for Diwali. The sizzling electric colourful lights flashing rhythmically has been transfixing everyone's eyes. At the entrance, the reddish-golden glittering sky-lantern, with its hanging dribbling paper tails too.. is welcoming all. She is searching her favorite star in the sky. The alluring spellbound presence of mirror...today, has almost dissolved everyone.When she peeped in the mirror, a spontaneous voice came, "Dear, You are too lovely... my earth's beauty. You are in my heart. How can I reflect you ? Its of mine only !" At the same moment, just like a shooting sky-star.. resembling with crackers, a very big sound was heard. And the mirror too slammed into several pieces.
-Sunil Pandit
Sir, beautiful & nice descriptions. Txs.
ReplyDeleteThank you very much...🙏
DeleteBeautiful.. Your short stories gives beautiful message.
ReplyDeleteThe apt epithet describes the beauty of reader's mind.
DeleteThanks.
नमस्कार , छान वर्णन केलंय. पण शेवट असा कां बरं...असा विचार मनात आला. कदाचित प्रेमाचा शेवट विरहातच होतो असं इतिहास सांगतो म्हणून तर नव्हे ! पण आवडलं लेखन.लिहिते राहा सर.
ReplyDelete--- पु. रा. रामदासी.
नमस्कार सर.. धन्यवाद.
Deleteप्रतिबिंबे विरघळवून चकाकणारा आरसा सौंदर्याचा आस्वाद घेताना स्वत प्रखर बिंबामध्ये समरस होऊन अस्तित्व हीन झाला.
ही कल्पना अर्थात प्रयत्न केला आहे.
Great nice....
ReplyDeleteThank you Mm..
Deleteस्वप्नभंग करणारा शेवट पण सुंदर चित्रण..
ReplyDeleteनमस्कार मॅडम.. धन्यवाद.
Deleteस्वप्नपूर्तीचां शेवट..!!
प्रतिबिंबांची सौंदर्य-बिंबात समरस होण्याचा.
असा मुक्त प्रयत्न केला आहे.😊
Amazing 👏
ReplyDeletePleasant story equipped with necessary emotions. Mirror represent the persons ego which truly slams in real life also.
ReplyDelete