Labels

Monday, December 7, 2020

उन्मेष

फुल मोहक मादक 

काटा कडक दाहक.


लोभस फुल कोमल

कल्पक काटा आदब


उन्मेष सहजीवनाचा

उभयतां हवाहवासा...!


फुल डौलदार नाजूक

धूंद पाकळ्या साजूक


काटा टोकदार दरदी 

सल क्षणिक बोचरी,


निमिष सहवासाचा, 

तरीही नकोनकोसा.


अभिजात सौंदर्य फुलं

भावतात मज स्वच्छंदी

जसे क्षणाक्षणांचे मार्दव.!


अभिशप्त उनाड काटे

भासतात मज अनादि

जसे युगायुगांचे आर्जव !!


-सुनील पंडित, पुणे.


17 comments:

  1. खूप छान कविता...

    ReplyDelete
  2. खुप छान कविता आहे.आयुष्यातील सुखदुःख नेमक्या शब्दात व्यक्त केले.छा छानच.
    बनकर सर

    ReplyDelete
  3. Your poems are like flowers blooming in all seasons.

    ReplyDelete
  4. सुंदर....
    -- रामदासी.

    ReplyDelete
  5. सहज दरवळणारी कविता..

    ReplyDelete
  6. Kuuuuuupch .......bhavnari kavita

    ReplyDelete
  7. Adoption of a different form...mind blowing...

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS