Labels

Monday, December 21, 2020

ऋतुमर्म

  ऋतुमर्म असे कळले,

         जीवन गारुड वाटले.

  वसंत बेभान उमलतो,

          कोमल मन फुलवतो.

  ग्रीष्म तेजस्वी तळपतो,

           काहिली ही अनुभवतो.

  वर्षाऋतु धो बरसतो,

           सलिल नितळ सिंचतो.

  शरद चांदणं माळतो,           

           पित्त अंतरंग कळतो.

   हेमंत बल खुलवतो,

          आरोग्य ढाल बनवतो.

   शिशीर पाने आमंत्रितो,

            देह भान सुचना देतो.

   सजीव कोडं उमजतो,

            ज्ञान समाधी लीन होतो.

  -सुनील पंडित, पुणे.

13 comments:

  1. नितांत सुंदर ऋतु वर्णन! खूपच छान!अभिनंदन!

    ReplyDelete
  2. Your poem describes human behavioural pattern affected by the seasonal changes.very skillful writing.👌👌

    ReplyDelete
  3. खुप छान ऋतू रंग
    खुप छान देह भान देणारी कविता

    ReplyDelete
  4. उत्तम निसर्गभान देणारी कविता

    ReplyDelete
  5. वा...खूप छान लिहिलंय सर. लेखणीचा संचार सर्वत्र होत चाललाय. लेखक बनण्याचा प्रवास वेग पकडतोय.
    -- रामदासी.

    ReplyDelete
  6. खूपच छान लिहलंय सर.ऋतु गंध धुंद करतोय...

    ReplyDelete
  7. Very nice.true blend of nature and human being

    ReplyDelete
  8. Every season has its own beauty.. Beautiful poem.

    ReplyDelete
  9. निसर्ग चक्र व समाधी परस्पर संबंध दर्शवणारी कविता.
    अभिनंदन!💐💐

    ReplyDelete
  10. उत्तम निसर्गभान देणारी कविता

    Reply

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS