Labels

Monday, January 4, 2021

मी..नो..पाॅझ्ड्..!!

तो धटिंगण धीट मस्त गुटगुटीत,

ती नाजुक नेटकी नीट शिडशिडीत.

तो मन मौजी दंडेल मिजासखोर,

ती उत्साही चंद्र-किरण पाणीदार.


तो देखणा साहसी अन् रुबाबदार, 

ती रुपेरी स्टनिंग छान बहारदार.

वेगळी कामे मग वेगवेगळी सत्र,

पण दोघे भरपूर वेळ एकत्र..!!


तो थोडा असायचा..जास्त बिझी,

तिची गरज मात्र..थोडी कमी.

कच्चं बच्चं, रफ.. काम तिचं,

फेअर वर्क.. मात्र केवळ त्याचच.


शाई-नीप ओळख त्याची कसदार,

पेन सतत दिसायचा तसा कामदार.

तिचा रंग रूप.. आकार शिसेदार,

पेन्सिल हवी नेहमी शार्प टोकदार.


वेळ-काळ पळतो भन्नाट वेगात,

नवी पिढी निघाली आहे जोमात.

अप्सरा कॅमल..नको नको आम्हाला.

बिचारे पेन पेन्सिल पडले बाजूला.


हिरमुसले गेलेत भरपूर, पेन पेन्सिल,

सांगतात प्रतिके..त्यांची छोटी कथा. 

जगतात आयुष्य भरभरून, मेल फिमेल,

हळहळते दुनिया..पाहून त्यांची व्यथा.


देखणा पेन झाला एकदम आयसोलेटेड्,

क्यूट पेन्सिल झाली टोटल आउटडेटेड्.

इंक-पेन म्हणे what's this called?

पेन्सिल बोले me,..no..paused..!!!

©सुनील पंडित, पुणे.


15 comments:

  1. Wahhh mast warnana kelay sir pencil ani pen cha... So true that in digital world now they are not much used also...

    ReplyDelete
  2. बदलता काळ आणखी काय काय अडगळीत टाकणार आहे हे तो कालपुरुषच जाणे ! उरतील त्यांच्या फक्त आठवणी तुमच्यासारख्या डिजिटल लेखकाच्या रचनेत ! खूप छान. लिहिता साधं पण अर्थ निघतो गहन.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  3. Generation gap very well depicted in the story. Meaningful awareness in your writing. 🙏

    ReplyDelete
  4. साधा विषय पेन्सिल नीं पेन, बदलता काळ वेगवान गतिमान, आजचे उपयुक्त उपकरण, उद्या उरते फक्त तीची आठवण. कोणत्याही विषयावर तुझी लिहिण्याची शैली खूपच छान.

    ReplyDelete
  5. Waw , beautifully narrated 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🤝🤝

    ReplyDelete
  6. How do you get the issues? I hope a small book taking shape. Why not try publishing it on the public platform like magazines or newspapers?

    ReplyDelete
  7. Too good!!! Had read an article long time back...Men - O - Pause in a magazine. But this poetic composition is amazing...

    ReplyDelete
  8. काळानुसार पेन व पेन्सिलचा पॉज चे सुरेख वर्णन.

    ReplyDelete
  9. सहज फुलत गेलेली शब्दांची बाग, फारच सुंदर!😊👌👌

    ReplyDelete
  10. कविता वाचून आज पेन व पेन्सिल दोघाना पण जवळ घेऊन बसलो होतो. आपलं म्हणणं किती छान ते व्यक्त करतात.
    जशी तुम्ही केलेली ही कविता. खूपच छान.

    ReplyDelete
  11. Impressive..being so thoughtful about the journey of pencil/pen and the message through your poem of " No pause" attitude.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS