चिमणा चिमणी अशी संसार जोडी
मौज सहजीवन नवी अवीट गोडी.
चिमणा बाबा सु-स्वभावी मधाळ,
चिमणी बाई तर सु-स्वरूप रसाळ.
रुबाबदार चिमणा निखालस तन्मणी,
कर्तबगार चिमणी चिरंतन चिंता-मनी.
स्वभाव तिचा तीक्ष्ण तेज कातरी,
वागायला थोडी, जरा जास्त भितरी.
दाणे टिपण्यात केवळ चिमणा निडर,
चिवचिव करण्यात प्रेमळ चिमणी बेडर.
ती म्हणे,अधिक जपणं..निव्वळ पांगूळपणा,
देऊ नका नाव,..त्याला सोज्वळ भितरेपणा.
प्रेमामध्ये दोघांच्या कधीच नव्हतं दूमत.
वागण्यामध्ये आता मात्र होईना एकमत.
एकदा का कसं झालं, ती खूपच मूसमसली.
तनमनाने दोघे पण कायमचीच हिरमुसली.
घरटं दोघांचं सुंदर...झाले अचानक काळं,
क्षणात तिने ठोकले...दोषी नशिबालाच टाळं.
© सुनील पंडित पुणे.

चिम चिम करीत जगात होते सुंदर जीवन पण अचानक झाले काळे नशिबाचे टाळे... जीवनाचे सुरेख विश्लेषण.
ReplyDeleteअति तरल मनाचे सूक्ष्म चित्रण...👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम.
Deleteनवलाईचे तन-मन सध्या वेगाने संकोचत का जाते? मनोमन ठसलेल्या अशा विविध गोष्टींचा वेध घेण्याचा एक साधा प्रयत्न येथे केला आहे..
खूप सुंदर...पण शेवट निराशावादी heart felting vatat aahe
ReplyDeleteChhan
ReplyDeleteवास्तवदर्शी... कोणत्याही सुंदर गोष्टी ला 'अंत' हा शाप असतो. हेच अभिप्रेत आहे नां सर...! छान.
ReplyDelete--- रामदासी.
सर जी..
Deleteआपल्या "प्रसन्न"पारखी नजरेला भरभरून सलाम.
धन्यवाद..
Perhaps it TIME that brings all to the harsh reality of life. Accept and go ahead. Fate is not to be blamed.
ReplyDeleteThank you Sir ji.
DeleteTime rules life beyond human expectations...
Thank you very much for your blessings.
Life is a fine blend of joy and sorrow. But at times of confrontation its difficult to deny the harsh reality in life.
ReplyDeleteThanks...Anita.
DeleteThank you very much.
You have pin pointed the truth of blended lives.
Theme & Form uniquely represented
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDeleteमानवी जीवनाशी सुसंगत चिमणा चिमणीचे हा अत्यंत सुंदर नातं अप्रतिम सर जी
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteएकदा का कसं झालं..... ह्याचाच शोध घेणं आवश्यक.तिथेच तर मेख आहे. असे क्षणच हळुवारपणे हाताळायला हवेत...नशिबाला दोष देण्यापेक्षा... वास्तववादी समस्यांचे आकलन व त्यावर उपाय अहं मध्ये न येवू देता शोधल्यास ..जीवनातील चिम चिम...आनंदी चिवचिवाट चालू राहू शकेल. विचार प्रवर्तक कविता.
ReplyDeleteधन्यवाद सर जी...
Deleteखुपच छान कमेंट... सतत मनाला उभारी देत राहील अशी..
कारण "मेख" असलेली ओळ अचूक आपल्या कौतुकास उतरली.
पुनःश धन्यवाद..सर.
🌷🙏🏻🎊
खूप छान...
ReplyDeleteमनस्वी आभार अॅल
Deleteचिमणा चिमणी च्या आनंदी जीवनात घातला शेवट नशीबाने घाला.शेवटी नशीब,कुणाचेही असो.
ReplyDeleteधन्यवाद 😁... आयुष्य हे...
DeleteSimple narrative. Deep emotions. Thank you sir.
ReplyDeleteThank you Mm
Delete