Labels

Monday, January 11, 2021

DIVINITY/दैवत्व

All says He is in the high blue sky .. 

I desire to meet Him.. so search started soulfully.

Attainment becomes the ultimate goal. 

The azure sky is visibly very clear ... 

Descry cotton-like.. white clear clouds.

One crystalline cloud charmed me ..

Like the most alluring.. North star.

That cloud seemed nicely snobby.. but different. 

Felt it...would be His mobile throne.

But dear, He didn't meet ...in the clouds.


Then I get down from a bove ...

Sighted lots of trees here..total yellow.

Their unyeilding greenery was lost.

Only haptic yellow alwhere.

Didn't comprehend...it's agony.

Exactly how has it caused?

Thought probably frenzy..19, covided...!!

Coz 20-20 ..just hit and run !!!

The teensy 21 may be final hope !!!!

But dear, He didn't meet ...in the trees.


I come down further.

Barely set foot on the soil.

A clay footpath perceived. 

Leading somewhere far away ... 

Through those yellow trees.

I'm sure... if I walk further this whirly path, 

I will definitely meet Him.

Great like him. 

Optimum like him. 

Divine like him. 

Felt in all.... 

Occupying...almost everything. 

The ultimate One.

But my dear, He didn't meet ...in soil too.


Not in clouds..trees..or soil....no-where! 

Found a double detour path. 

Whirling  bemusedly further ... 

Towards infinite divine paradise!!!

© Sunil Pandit, Pune.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

                     दैवत्व

उंच निळ्याभोर आकाशात असतो तो..

सर्वजण हेच सांगायचे मग केली सुरुवात

मला तो हवाय.. आणि सुरु झाला..शोध

अंतिम ध्येय बनले ते...


निळे आकाश निरभ्र भासले...तरी,

कापसासारखे काही पांढरे स्वच्छ ढग भेटले..

एकाने मात्र मोहिनी घातली.. अगदी..

ध्रुव ता-यासारखी अचल...!!

तो आकर्षक ढग.. थोडा वेगळाच होता.

वाटलं... संचारी सिंहासन ते हेच असावे.

पण तो नाही भेटला... ढगांमध्ये.!!


मग तिथून थोडा खाली उतरलो...

खुप झाडं दिसली... चक्क पिवळी धमक.

टंच हिरवेपणा हरवला होता..पुर्ण.

सर्वत्र केवळ पिवळाच रंग.

समजत नव्हते...असे नेमके काय झाले आहे?

वाटून गेले कदाचित १९ चे कोव्हीडेड असावेत.

२०-२० तर असेच संपले होते.

निदान २१ मध्ये वेगळी आशा करूया!!

पण तो नाही भेटला... झाडांमध्ये.!!

 

म्हणून थोडं आणखी खाली उतरलो.

आता जमिनीवर पाऊल ठेवले. 

मिळाली मातीची एक पायवाट .

दूरवर कुठेतरी जाणारी..पिवळ्या झाडांमधूनच.

खात्री वाटली..ही वाट चालत राहिलो तर..

तो निश्चित भेटावा.

त्याच्यासारखा  Great. 

त्याच्यासारखा  Optimum. 

त्याच्यासारखा  Divine.

मनाला भावणारा...

व्यापून टाकणारा.. आहेच तो एकमेव.

पण इथे सुद्धा, तो नाही भेटला... मातीमध्ये.


ढगात..झाडीत...मातीत.. कुठेच नाही.

पण एक गवसली गहन वळणांची दुहेरी पायवाट,

नागमोडी दिसणारी...थोडी वेटोळी. 

त्या अमर्याद दैवी नंदनवनाकडे जाणारी.!!!

© सुनील पंडित, पुणे.


14 comments:

  1. छान कविता आहे.आशावादी विचार खुप छान.

    ReplyDelete
  2. आयुष्यातील वाटा अशाच कधी कधी गूढ वाटतात,पण पुढे नेणारी उर्जा मनाला टवटवीत करते.

    ReplyDelete
  3. Your poem is rekindling of the soul and opening of the eye of wisdom to connect the Supreme Being or God.

    ReplyDelete
  4. परमेश्वर चराचरात आहे....तो दिसत नसला तरी त्याचे अस्तित्व अनंत ठिकाणी आहे...ही आशा आणि विश्वास म्हणजेच ती नागमोडी पाऊलवाट......
    काव्य छान केले आहे सर...

    ReplyDelete
  5. खूप छान आहे रचना. पंचमहाभूतांमधे सामावलेला 'तो' अंतरी उमजतो शोध घेता घेता. भेटेल कदाचित शारदेच्या शब्दांत !
    --- रामदासी.

    ReplyDelete
  6. गहन वळणाची दुहेरी नंदनवनाकडे नेणारी पाऊलवाट. खूप सुरेख व अप्रतिम कविता.

    ReplyDelete
  7. गहन वळणाची दुहेरी नंदनवनाकडे नेणारी पाऊलवाट. खूप सुरेख व अप्रतिम कविता.

    ReplyDelete
  8. गहन वळणाची दुहेरी नंदनवनाकडे नेणारी पाऊलवाट. खूप सुरेख व अप्रतिम कविता.

    ReplyDelete
  9. खूप छान कविता आहे!

    ReplyDelete
  10. Beautifully expressed.. In search of the Divine.

    ReplyDelete
  11. Divinity revisited....

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS