नाती असतात निखळ झ-यासारखी
अवखळ...झुंजूमूंजु खळखळणारी
अवघड वळणे सहज पार करणारी
प्रेमानं ओथंबणारी......आर्जवणारी
मुक्त बहरणारी.. चित्त प्रसन्न करणारी.
रूणझूण प्रवाहीत निर्मळ जलधारा
ओढ्यातल्या दगड गोट्यांना वेढणारी
झुनझुनणारी... नादब्रह्म साकारणारी
ओलावा टिकवणारी.....भिजवणारी
मंजुळपणे... निर्भेळ आनंद देणारी.
अशी नाती...असे झरे
परिघात वाढतात....वाहतात.
जातात त्या वर्तुळाच्या पलीकडे.
बंध जोडतात... स्नेह शोधतात.
हृदया-हदयातुन.. रुधिरासम...धडधडत.
नाती असतात शीतल वृक्षासारखी
जोमाने वाढणारी....जोपासणारी
कौतुकानं मिरवणारी, दिमाखात डौलणारी...
सळसळणारी...तरारणारी ... फोफावणारी.
काळासंगे नादमय विस्तारणारी.
अशी नाती....असे वृक्ष.
अनुक्षेत्रात फुलतात...सजतात.
पानोपानी फांद्यांच्या पलिकडे...
पारंब्या अलगद सोडून...फुलवतात
प्रेम मना-मनामध्ये...अधिरासक्त.
कधी चुकणारी...चुकवणारी..
लयीत मिसळणारी.. वेगळेपण जपणारी
सुखावणारी...सामावणारी.....
वाटसरुला हवीहवीशी वाटणारी
स्व-छाया देणारी...क्षणभर विसावा देणारी.
ती नाती...ते झरे...आणि ते वृक्ष..
फुलतात प्रेमळ ममतेने,
काळव्यापित मर्यादेपर्यंत..
फांद्या,पारंब्या तर कधी बनुन पाणझरा,
विशुद्ध जीवनासाठी..उज्वल वसुंधरेसाठी!!
©सुनील पंडित, पुणे.

उत्तम
ReplyDeleteपाणी व नाती खूप रमणीय!😊👌👌
ReplyDeleteमस्तं ����������
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteBeyond Imagination as it takes the readers in the realm of reality where relations have lost its flowing and shadowing capacity !Lovely poem...👍
ReplyDeleteFresh and so beautiful
ReplyDeleteनिसर्ग आणि नात्याचा प्रवास विलक्षण आहे. खूप सुंदर कविता
ReplyDeleteसुंदर👌😊
ReplyDeleteखूप छान. शब्दांनी नटलेली रचना. आणि नात्यात गुंफलेली.
ReplyDelete--- रामदासी.
Wahhh, sundar... Superbly described sir...
ReplyDeleteSunder.....
ReplyDeleteBeautiful
ReplyDelete