कोडे साधं पण उत्तर कळेना
कळले जरी पण सहज वळेना
मनं तयार पण अजिबात मानेना
स्वप्न पाहिले पण पुन्हा पडेना
डोळे आतुर पण पापणी लवेना
सहज सोपे पण कुणाला समजेना
उत्तर सोपं पण प्रश्नच सुटेना
बोलायचे नेमके पण जीभ रेटेना
ओळख पटली पण डोळे भिडेना
खरं असुन कुणी काही बोलेना
वेड प्रेमळ भुल भूलैय्या सुचेना
मस्त धुंद मोहक क्षण अनु-भवेना
का कुणी सांगेल किमया केवल
सौंदर्य अनुभवते शुभ्र रंगी धवल
कृष्णकळी खुलते जाई जुई नवल
उमजेल कधी हे अबोल फूला
शब्द खेळ प्रसन्न मना मनातला
समजेल ना ते ही लवकर तुला
भाव सारे तुझ्या अधिर नेत्रातले
सांग अडीच-तीन अक्षरे जगाला
अंतरंग कळु दे ह्रदयाचे.. ह्दयाला.
© सुनील पंडित, पुणे.

ढाई आखर प्रेम का...।👌
ReplyDeleteSunder
ReplyDeleteWahhhh...sundar kavita sir... 👌👌👌
ReplyDeleteशब्द सुचत नाहीत म्हणून ❤❤
ReplyDelete👌😊
ReplyDeleteअधीर नेत्राने हृदयाचे अंतरंग जगाला सांगितले तर कळेल, समजेल, उमजेल व मनातील मस्तता, धुंदता व मोहकता अनुभवता येईल ...
ReplyDeleteखूप छान. शब्द साधे पण भाव सुंदर..
ReplyDeleteखूप सुंदर सर
ReplyDeleteशब्द रचना सुंदर..
ReplyDeleteThe poem describes the eternal love waiting for right time to express... truely testing the nobler minds... nicely composed way.👌
ReplyDeleteNice title and description of love.!
ReplyDeleteशब्दगंध. मस्तच
ReplyDeleteLove is happiness ,the one who experiences..expresses beautifully it makes you feel complete... Beautiful poem..
ReplyDelete