माझी प्रिय माय,
मातृभाषा जी हाय,
मराठी गोड माय,
आहे साजुक साय.
मराठी माझी माय
कपिली साधी गाय
महती मोठीच हाय
मोपली कधीच नाय.
सगळं साधंच हाय
नाही विषेश काय
सांगत वेगळं नाय
पण नका करू बाय.
माझी इच्छा आतुराय
माय बोली आस्तिकाय
मराठी होईल अंतराय
आहे मनाचा अभिप्राय.
बोलु आपण मराठी
ऐकू आपण मराठी
वाचु आपण मराठी
लिहू आपण मराठी.
© सुनील पंडित, पुणे.
ता.क.
(आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा,२१ फेब्रु २१)
(कृपया प्रत्येक ओळीचा प्रथम शब्द उभा सलग वाचा.)

मी गर्वाने सांगतो माझी मातृभाषा आहे व त्याचा मला खूपच अभिमान आहे. अप्रतिम वर्णन.
ReplyDeleteवा...खूप छान. प्रत्यक्षात सर्व मराठी बांधव मराठी मधे बोलावेत हीच इच्छा आहे. सुरवात स्वतःपासून करु या. मराठी भाषेला कृतज्ञ नमस्कार.
ReplyDelete--- रामदासी.
उत्तम कविता 🙏
ReplyDeleteकवितेत अवीट गोडवीं हाय
ReplyDeleteMazi maymarathi👌👌
ReplyDeleteतुमचे अस्मात तस्मात मज नेणे गा।
ReplyDeleteमज चक्रधरे निरूपिली मराठी।
(केसिराजबास-महानुभाव पंथातील लेखक, महानुभाव पंथाचे अनुयायी)
यांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे.
आजही आपण सार्थ अभिमान व्यक्त केला. ☺️👌
Wahhh sundar lihilay sir... Specially the first word of the poem concept..
ReplyDeleteखरे मातृभाषा प्रेम.
ReplyDeleteमातृभाषेला वंदन फारच छान.
ReplyDeleteमराठी पाउल पड़ते पुढे ..…...
ReplyDeleteसूंदर रचना....
"My mother tongue is also my Mother..."
ReplyDeleteWhat a excellent concept of first word sir!!
ReplyDelete