While coming down the mountain road, her ingenious gaze fluttered freely on the embracing virgin stream of moving water. The car stopped suddenly. She ran and entered into the pristine rushing water. Enjoying the soft touch like a peacock feather of bilori crystalline chilled water, she felt the tamarind tree on the opposite bank loaded with abundant pods seemed as chinar tree. Seeing the serene beauty of her effulgent kashmiri complexion of lower legs, the flowing current of water too got whirled around her legs as if it got locked-down. The unruled splashing of water brought genuine glow on her face. Being under the double pressure of work and home, she experienced the freeborn feel of truly unlocked today.
© Sunil Pandit, Pune.
टॅग स्टोरी : २९
डोंगर उताराच्या रस्त्याने येताना तिची कल्पक नजर निसर्गाच्या कुशीत स्वच्छंदपणे दुडूदुडू वाहणाऱ्या ओढ्यावर पडली. क्षणार्धात गाडी थांबली. ती धावतच झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यात उतरली. बिलोरी स्फटिकासम थंड पाण्याचा मोरपिशी मुलायम स्पर्श अनुभवताना पलीकडच्या काठावरील घसघशीत चिंचा लगडलेले झाड..तिला जणू चिनार वृक्षासारखे भासु लागले. तिच्या सुंदर चमकदार पायाच्या काश्मीरी रंग सौंदर्याने प्रवाहित पाणी सुद्धा लाॅक्ड् डाऊन झाल्याप्रमाणे जागेवरच फिरून थांबु लागले. मनसोक्त "जल"क्रीडा करताना तिचा चेहरा प्रसन्न खुलला. वर्क आणि होमच्या डबलप्रेशर नंतर खरंखुरं मनमुराद अनलाॅक होणं तिने आज अनुभवले.
©सुनील पंडित, पुणे.

निसर्गाचे देणे अलगद घ्यावे... मनमुराद आनंद.
ReplyDeleteआनंदाचे डोही आनंद तरंग।..
खुप सुंदर सर ����
ReplyDeleteनिसर्गात मनसोक्त हिंडून मनमुराद आनंद लुटणे. अति सुरेख.
ReplyDeleteपाटाचं पाणी झुळझुळ वाणी,त्यात हिरवेगार चिंचेचं झाड मनमोकळा श्वास, आनंदी आनंद.आता अनलाॅक झाल्याचा खरा आनंद वर्णिला, छान सर.
ReplyDeleteबनकर सर
The love towards nature seems truely unlocked in your story. Imagination yet meaningful. 👌
ReplyDeleteनिसर्गा इतक सुंदर काहीच नाही.. खुप खुप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteव्वा... झकास वर्णन. लाँकडाउन नंतरचं असं निसर्गाच्या कुशीत अनलाँक होणं...आत्मिक संतोषाची परमावधी. सुंदर शब्द , सुंदर वर्णन. आवडलं.
ReplyDelete--- रामदासी.
Khup chhan!
ReplyDeleteअनलॉक क्षणांचा सुंदर अनुभव...
ReplyDeleteNature heals all the negativity... Beautifully described it sir...
ReplyDeleteApt metaphor of unlocking process. Unlocking minds like nature to evolve and enjoy. Too good Sir!
ReplyDelete