फाल्गुन महिना प्रसन्न पौर्णिमा,
आवडती सर्वांची होळी पौर्णिमा.
ओळख असते तिला वेगवेगळी,
नांव तिचे, मात्र मनपसंत होळी.
माझा देश भारत प्रांत महान,
होळी तरी असेल,कशी लहान.
कुठे नाव तिला होलिकोत्सव,
कुठे बनते मस्त धूलिकोत्सव.
कुठे उसळतो बेधूंद रंगोत्सव,
खुलतो खरा वसंत आगमनोत्सव.
उत्तरप्रदेशाची लाठमार होली,
उत्तराखंडांत असे खडी होली.
राजस्थान उधळे गुलाल होली,
केरळ सजवतो मंजल कुळी.
बंगालची फागुन जत्रा-दोला,
पंजाबचा मस्त मोहल्ला होला.
बांके बिहार मनवतो फागूवा,
चहाचा आसाम करी फाकुवा.
मणिपूर याओसांग महिलाहोळी,
सातपुडा गरजतो काठी होळी.
महाराष्ट्र उभारतो समिधा होळी,
स्वाद वाढवी तुपाची पुरणपोळी.
गोमूचा असे कोकणात शिमगो,
छोटा गोवा करी मोठा शिगमो.
ओलांडले किती प्रांत अन् भाषा,
भेद अज्ञानाचा ठेवु गुंडाळून गाशा.
उल्हास घटका साक्षात प्रफुल्ल मना,
जपुन ठेऊ संस्कृतीच्या प्रणय खुणा.
© सुनील पंडित, पुणे.
Monday, March 29, 2021
फाल्गुन पौर्णिमा
Subscribe to:
Post Comments (Atom)

सर्व भारत भूमीचे वर्णन या कवितेत आलेले आहे. भारतात होळी या सणाला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं. त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन आपण छानपणे कवितेत मांडले आहे.
ReplyDeleteभारतीय संस्कृतीतील महत्वाचा एक सण त्यांची नावे अनेक. सुरेख वर्णन.
ReplyDeleteAmazing
ReplyDeleteAwesome sir keep it up....
ReplyDeleteसुंदर एकसंध भारत
ReplyDeleteहोळी पौर्णिमे च्या हार्दिक शुभेच्छा सर
सण एक, उत्सव अनेक
ReplyDeleteप्रांत अनेक, भारत देश एकमेव
अप्रतिम वर्णन!
धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा!😊
अमेझिंग सर, भारत देशाचे प्रतीक विविधतेत ऐकता सुंदर वर्णन
ReplyDeleteअमेझिंग सर, भारत देशाचे प्रतीक विविधतेत ऐकता सुंदर वर्णन
ReplyDeleteअमेझिंग सर, भारत देशाचे प्रतीक विविधतेत ऐकता सुंदर वर्णन
ReplyDeleteअमेझिंग सर, भारत देशाचे प्रतीक विविधतेत ऐकता सुंदर वर्णन
ReplyDeleteSunder
ReplyDeleteWell researched and nicely worded truly Holi in it's national context and with BHARATIY spirit. Happy Holi.
ReplyDeleteYour poem is a beautiful blend of colorful information of Indian culture, giving the spiritual message of holiness to the whole world.🎊
ReplyDeleteLovely.... One festival variety of names and ways of celebrating it... What a beautiful country we belong to.. Proud of India... Bharat safar ghadawali sir tumhi... Kavita suresh... Wahhh...
ReplyDeleteसण एक उत्सव अनेक वर्णन वर्णन
ReplyDeleteएकाच सणाची इतकी नावे वाचुन खुपच छान वाटले.
ReplyDeleteखूप छान. माहितीपूर्ण.
ReplyDelete--- रामदासी.
Different cultures and different ways of celebrations...very well described.
ReplyDeleteSir The way you described Different Cities and their tradition With holi was Fabulous !! It gives best sample to Present A beautiful short poem ...Learned a Lot !!
ReplyDelete