Labels

Monday, June 22, 2020

इमेजप्रिंट

    

डेस्कटॉप वरील इमेजला

डिलीट होण्याचं भय 

तसं कमीच असतं,

फोल्डर मध्ये पुश करणं  

तसं थोडसं आनंददायी ठरतं...



पण...पीसीच्या हार्डडिस्कमधून...

म्हणजेच

काळजातून कागदावर 

उतरणा-या प्रिंटला 

माञ 

अवघ्या जन्मकळांचं 

दुःख सहन करावं लागतं.

       
- ©सुनील पंडित, पुणे.

11 comments:

Blog Canvas

GOD'S SMS