नील निरवकाश नभासाठी
नवसृजन अथांग आसमंतासाठी
क्षितीज–रेषा सहज ओलांडूनी¸
सूर्याला दररोज उगवायचे असते…
पहाट सोनसळी दवबिंदुच्या प्रथम आर्त तृष्णेसाठी…!
सदाहसरी…सदालाजरी…
निखळ…निरलस आणि निखालस
काया–रेषा ती उगाच लाजवूनी¸
सदाफुलीला दररोज उमलायचे असते…
उज्ज्वल प्रभाती सूर्याबिंबाच्या प्रथम दर्शनासाठी…!!
काहीही… हं…नकळत सत्वरे म्हणोनी
सरळ सकल आणि सरद शब्दगंधाची
भाव–रेषा ती सहज लपवूनी¸
मनसखीला दररोज उत्कंठ व्हायचे असते...
उत्कट उन्नत उत्त्फुल्ल बिंदुला उत्तरप्रश्न करण्यासाठी...!!!
-सुनील पंडित

Mast
ReplyDelete