Labels

Monday, July 13, 2020

उत्तर-प्रश्न


नील निरवकाश नभासाठी

नवसृजन अथांग आसमंतासाठी 

क्षितीजरेषा सहज ओलांडूनी¸ 

सूर्याला दररोज उगवायचे असते  

पहाट सोनसळी दवबिंदुच्या प्रथम आर्त तृष्णेसाठी…! 


सदाहसरीसदालाजरी

निखळनिरलस आणि निखालस

कायारेषा ती उगाच लाजवूनी¸ 

सदाफुलीला दररोज उमलायचे असते 

उज्ज्वल प्रभाती सूर्याबिंबाच्या प्रथम दर्शनासाठी…!!


काहीही… हंनकळत सत्वरे म्हणोनी

सरळ सकल आणि सरद शब्दगंधाची

भावरेषा ती सहज लपवूनी¸

मनसखीला दररोज उत्कंठ व्हायचे असते...

उत्कट उन्नत उत्त्फुल्ल बिंदुला उत्तरप्रश्न करण्यासाठी...!!! 

-सुनील पंडित



1 comment:

Blog Canvas

GOD'S SMS