आत्मिक शांत सु-विद्य कलाकार तु असा,
आविष्कार जसा साक्षात श्रेष्ठ पंचमहाभुतांचा ,
तरी ही घातलीस साद,
तु सरळ मृत्यूदेवतेला,
स्पर्शुनी त्या स्वप्नाळू मनोहर चंद्राला .
पृथ्वी रे का नको झाली होती तुजला?
अवघड महाकोडे घातलेस मानवाला.
सुटता सुटेना हा विलक्षण प्रश्नविळखा आता कुणाला ?
हतबल आहे तुझा जुवेबाज टेलिस्कोप या गूढ क्षणाला.
अर्पिलेस तु कायमचे तुझ्या 'स्व' ला,
अग्नी जल वायु भुमी अन् आकाश तत्वाला.
पाच महातत्वांचा मिलाप मेळविलास तु शांत ,
अग्नीचा झळझळता तो प्रकोप प्रलयी,
जलधारा सळसळत्या जलद प्रवाही,
वायुचा अश्वमेघ धरिला तू महावेगे,
त्यागुनी लाडिक मनोहारी वसुंधरेला,
अवकाश अवघे व्यापिले सु-स्थित शांतीला,
पाहुनी आकस्मिक सामोरे सर्व पंचमहाभूतांना.
-सुनील पंडित
अप्रतिम!!!
ReplyDeleteThanks Harshad...
ReplyDeleteकिती सुंदर प्रकटीकरण भावनांच.!
ReplyDelete