Labels

Monday, August 3, 2020

एक बेलपत्र....!!

मन मर्यादेत मनाच्या,
जाणतो तु सर्व काही,
मनाच्या ही मनातील !
नेणिवेचा तो अलगद मंद-स्पर्श,
भावतो सहज विस्मृतीच्या मधुगंधाला...!

देवा...महादेवा....
हे ..विश्वनाथा,
सायलेंट असुनही 'विश'
रिचवतोस कंठामध्ये.
भस्मी अंग मुकुट जटा सांब भोळा
व्याघ्राबंरी नीलकंठ तु सर्वात वेगळा.
शुभाशुभ असंख्य इच्छा...
जणू आभासी 'पेटल्स' मृदूगंधाच्या...!
फुलवितोस शिव भक्ती... तनामनात,
मनाच्या ही मनामध्ये अति'नील'मनात.

एक बेलपत्र वाहता तीन पानाचे,
जाणतो अनाअनादी सर्व काही,
सामर्थ्य देई मंत्र तीन शब्दाचे,
ओम नमः शिवाय...!
ओम नमः शिवाय.......!!
ओम नमः शिवाय..............!!!

©सुनील पंडित, पुणे.
ॐ....ॐ....ॐ.....ॐ....ॐ....ॐ....ॐ



7 comments:

Blog Canvas

GOD'S SMS