Labels

Saturday, August 15, 2020

TAG-S-TORY : 4

घरात नव्यानेच वायफाय सुविधा आली. परिसरातील नवा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर ही सुरू झाला. अन् तिच्या हातातील नव्या टॅबची स्क्रीन चमकली.आज प्रथमच तिच्या चेहऱ्यावर मनमोहक हसू झळकले. आता आपण ऑनलाईन शिक्षण घेणार या कल्पनेने ती अधीर झाली. ती आनंदाने मूसमुसली. तेवढ्यात जाॅईनिंग लिंक ही आली. मन बेभान झाले. तिच्या लांबसडक नाजूक बोटांना थांबवेना...तिने "आस्क टू जाॅईन" ला क्लिक केले... आणि त्याच क्षणाला मोठा स्फोट झाला.... आवाज एवढा प्रचंड होता की संपूर्ण परिसर हादरला...व सर्व काही भरदिवसा अंधारात गुडूप झाले...शिक्षणासह.

© सुनील पंडित पुणे.



No comments:

Post a Comment

Blog Canvas

GOD'S SMS