असं म्हटलंय...नावांत असं काय आहे?
पण काय हो...?
जर असेलच...तर, नक्कीच खुप काही!
...अन् जर शोधलंच तर...?
अगदी काहीही...!!
फक्त काही 'त्या' क्षणांमध्ये!
क्षण येता तो 'एक' विलक्षण,
नाळ तुटते...
अन् लगोलग आई बरोबर नाते जुळते.
पाळण्यात घालूनी नांव ठेवते माऊली,
वात्सल्याच्या तनाला...या शरिराला.
क्षण येता तो 'दुसरा' विलक्षण,
सुत्र-आवळण बांधता...
सप्तपदी ती मुसमुसून चालते...
तांदळात नवं नांव, नाजूक बोटाने कोरते
आणि नवी ओळख मिळवून देते सासर.
प्रितीच्या मनाला...भावनेला.
क्षण येता तो 'आणखी' विलक्षण,
नांव शिकवते की "जीवन सुंदर आहे"
ओळख ही निरंतर ठरते 'स्व'नावानेच...
नांव बनते समृद्ध तनामनांचे,
नाते जुळते पवित्र भावभावनांचे...!
फूलांहुन ही अधिक सुगंधित...
सुगंधाहून ही अधिक रोमांचित...
नांव काय असावे, त्या सुहृद नात्याला?
नात्याला काही नांव देण्यापेक्षा....,
नांव त्याचे काही ठेवण्यापेक्षा....,
त्याला निखळ "मैत्री" म्हणावं.
-सुनील पंडित.
No comments:
Post a Comment