Labels

Monday, September 7, 2020

मन-गाठोडे

कर साहस एकदा मनसोक्त,

कर चित्त एकदा भयशुन्य,

भय असते महाविघातक,

देते दुःख महाविदारक.

म्हणुन सहजच वाटतं....

जीवनातल्या सर्व दुःखाचे...

बांधुनी एक घट्ट गाठोडे...

झटकन फेकुन द्यावे...

त्या आभासी क्षितीजापलीकडे.
पण...

खरं क्षितीज शोधता शोधता..

नकळत अडकत जातो.. 

खोल गर्तेत दुःखाच्या.

आणि तेव्हांच....

कोमल, हळवं मन...

कळवळून विव्हळते...

अरे...मानवा..

फेकण्याऐवजी कवटाळ त्या,

तुझ्या गाठोड्याला...

दाखवूनी,

त्या अथांग क्षितीजाला.

-सुनील पंडित.

1 comment:

Blog Canvas

GOD'S SMS