लाईटस सुरु होताक्षणीच सर्वांच्या नजरा तिच्या राॅयल ब्लू रंगाच्या भरजरी रेशमी गाउनवर पडल्या व उंची रत्नजडित चमचमत्या नेकलेसवर खिळल्या. तो आज नक्की बोलेल याची सगळ्यांना मनोमन खात्री झाली. तिचं सौंदर्य-रहस्य फक्त त्यालाच माहीत होते. पण आजपर्यंत त्याबद्दल कुणीही कधीच उघड विचारणा केली नव्हती.त्याचा निश्चल-अबोला पेच आणखी वाढवत होता.आणि तेवढ्यात तो धीरगंभीर आवाजात म्हणाला,"माझ्या प्रिय मित्रांनो, ठेच दोन पद्धतीने लागते..! मुळीच न पाहिल्यामुळे किंवा फार दूर पाहात राहिल्यामुळे."
-सुनील पंडित
Kindly allow yourself to write more ....
ReplyDeleteThanks...
ReplyDeleteVery nice sir.
ReplyDeleteमार्मिक!👌👌
ReplyDeleteजीवन जगण्यासाठी खूच उद्बोधक ओळी .
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete