Labels

Saturday, September 26, 2020

TAG-S-TORY : 10

महानदीच्या संथ प्रवाहात एक छोटी मोटर-बोट त्या दोघांसह स्वच्छंद विहारत होती.त्यांचा प्रणयी धुंद आविष्कार नजरेत भरुन घेताना, नदीकाठांवरील झाडवेलींची पाने मनोमन शहारत होती, लज्जामस्तीने सळसळत होती.लाजेने चूर होऊन काही फांद्यानी तर आपल्या माना वळवल्या. उत्साही सुर्य किरणांनी उत्तुंग मोहक पर्वत शिखराला लगोलग चुंबले. गोड आवाजात गीत गाताना भान हरपून तो उत्फुलतेने अचानक उभा राहिला. विहंगम निसर्गात त्याने दोन्ही हात उंचावले. पॅन्टच्या खिशातून त्याचा मोबाईल फोन बोटीमध्ये तिच्यासमोर पडला. तिने तो अगदी सहजतेने उचलला व  स्वंयप्रकाशित स्क्रीनसेव्हर अभावितपणे चमकला. तिने तो पाहिला व पिस्तुलाचा मोठा आवाज व्हावा तशी ती कर्कशपणे भयानक किंचाळली... झाडांवरील पक्षी आकाशात फडफडले. त्याने मागे वळुन पाहिले.

-सुनील पंडित.

12 comments:

  1. Super suspense create kartat tumchya stories sir. ....

    ReplyDelete
  2. Dada, Khup bhari. Nakki sagle vachen ani tula sangto.

    ReplyDelete
  3. Very good 👍 👏

    ReplyDelete
  4. What a fine description. ... .. Mystery deepens and suspense thickens.
    Nice Sir!

    ReplyDelete
    Replies
    1. TAG-S-TORY is a new genre which I had in my mind in bygone lockdown days(*Tag-s-tory concept-page describes it),so that reflects here too.
      Thanks a lot.

      Delete
  5. बनकर सर ,. मस्त प्रणयलिला रंगात आली. कथेला अचानक कलाटणी मिळाली,शेवट रहस्यमय, पुढे पुअ्््.््

    ReplyDelete
    Replies
    1. Sir,Tag-s-tory मध्ये कथेची सुरुवात व शेवट कसा करायचा हे संपुर्णत:वाचकांनी ठरवावे असा माझा मानस आहे..म्हणुन तशी सोय येथे आहे.

      Delete
  6. This can be a screenplay for a short film....

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS