Labels

Saturday, September 5, 2020

TAG-S-TORY: 7

पहाटेची पाचची कुंद वेळ... नुकतीच पावसाने उघडीप दिली होती.काळाभोर रंग लेवून पहुडलेल्या त्या एकाकी रस्त्यावर तिच्या झपझप पडणा-या पावलांचा वेग वाढला.इअरफोन कानात व्यवस्थित करण्याची तिची लगबग खुपच केविलवाणी वाटली. हातांनी ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवत शोधक डोळे सैरभैर फिरत होते.पुढच्याच क्षणी भयावह वेगात तिच्याच दिशेने येणा-या प्रकाशझोताने तिला काहीच दिसेनासे झाले. करकर...कर.... कर्कश्य आवाज करीत गाडी तिच्या पायाजवळ येवून कशीबशी थांबली... दोन्ही हात उंचावून.... तिने मोठ्या आवाजात त्याला हाक मारली....सुर्या...!!!

4 comments:

  1. For a minute I could see myself there. ..just like a scene I saw it.

    ReplyDelete
  2. Ohhh....I too witnessed the same incident.

    ReplyDelete
  3. पुढे काय ? उत्सुकता वाढली.

    ReplyDelete
  4. Thanks....it's typical format of tag-s-tory which I intended....you can visualize or create your own...story ahead.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS