Labels

Saturday, September 19, 2020

TAG-S-TORY : 9

दोघेही आपापल्या तो-यात थरथरत होते.तसं तिचं विशेष काहीच म्हणनं नव्हते. एकमेकांशिवाय दोघांच पानही हलणार नाही हे त्यांना माहीत होते.सुर्योदयाला सुरू झालेला त्यांचा "अबोला" संपेना. आता हळूहळू, तो आणखी पलीकडे सरकला तशी तिची तगमग वाढली.मन एकदम चरकले. त्याने अजून टोकाला जाऊ नये असंच तिला मनोमन वाटत होते. ती फांदी आता खुपच वाकली होती... क्षणभरासाठी तिला वाटलं...जर कुणी एकानं भरारी घेतली तर....? पण पुढच्याच क्षणी, एकाच वेळी दोघांनी वळून घरट्याकडे पाहिलं.... पिलं भुकेली होती.. अन् सुर्य मावळतीला होता.

-सुनील पंडित.

19 comments:

  1. ख-या प्रेमात रुसवा कापरासारखा उडून जातो हेच खरं.तुमची लघुत्तम कथा हेच सुंदर शब्दांत सांगते. छान. लिहिते राहा.
    --- रामदासी. पी. आर.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर..आपले मार्गदर्शक शब्द नेहमी स्फुर्ति देतात

      Delete
  2. सुंदर लिहील आहे👌👍😊

    ReplyDelete
  3. सुंदर लिहीलं आहे 👍👌😊

    ReplyDelete
  4. सुंदर लिहीलं आहे 👍👌😊

    ReplyDelete
  5. Heart touching..so related to real life.

    ReplyDelete
  6. कमीतकमी शब्दात उत्कट उत्कृष्ट भावनाविष्कार!

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS