Labels

Monday, October 5, 2020

मम स्पर्शकुपी

रेशीम बंध दिसे नाजूक चाफा

स्पर्श गंध भासे नव सोनचाफा

नयन कटाक्ष जसे कमानी तीर

बिंब एकाक्ष दिसे दृश्य पैलतीर.


दरवळ धुंद आविष्कार प्रभावी

सौंदर्य जीवा ओढ मज लावी

मऊ मुलायम मम हवाहवासा,

चंद्रमौळी तुझा संग नाजूकसा..!


लाभता आनंद तव स्पर्शाचा,

सु गंध न लगे मज अत्तर कुपीचा.

घायाळ गुल नजर, मी बघे स्वर्गपरीची

नजाकत ही दुरून, न कळे स्पर्शकुपीची.

-सुनील पंडित


28 comments:

  1. व्वा पंडित सर , आशिकाना मूड छान पकडलाय रचनेत. खूप छान कल्पना ! स्पर्शाला कुपीची उपमा मस्तच. कारण कुपीचं झाकण उघडल्याखेरीज जसं कुपीतील गुपित कळत नाही तसंच स्पर्श केल्याखेरीज स्पर्शातील अमीट गोडवा अंतरंगात जाणवत नाही. स्पर्शा-स्पर्शातही किती फरक...आईचा , बालकाचा , वृद्ध सुरकुतल्या हाताचा आणि...'तिचा'...असो. तुमची रचना वाचून काय काय सुचत जातं. छान. लिहिते राहा.
    --- रामदासी पु. रा.

    ReplyDelete
    Replies
    1. सर जी.
      आपल्या प्रसन्न शुभेच्छासाठी मनोमन धन्यवाद.
      आशिर्वादाची किमया सहज स्फुर्ती देते.

      Delete
  2. खुपच सुन्दर कविता

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर प्रतिक्रिया. मनस्वी धन्यवाद...

      Delete
    2. खूपच सुंदर कविता केलीय

      Delete
  3. Wahhh sundar prem kavita sir... 👌👌👌

    ReplyDelete
  4. very nice poem...dream princess

    ReplyDelete
  5. खुप सुंदर कविता, अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. �� अप्रतिम ��

    ReplyDelete
  7. व्वा! छानच कविता.स्पर्श केल्याशिवाय अर्थ कळत नाही , आणि कुपी ऊघडल्याशिवाय गंध येत नाही.आता स्पर्श कसा आणि गंध कसा हा ज्याच्या त्याच्या विचार सरणीवर अवलंबून. बनकर सर

    ReplyDelete
  8. काय सुंदर लय पकडलीत सर.रामदासी सरांनी अचूक रसग्रहण केलय. थेट भिडणारी शब्दरचना. शब्दांचं आंणि मनाचं तारूण्य फुलतय व त्याचा गंध आमच्या कुपीपर्यंत पोहोचतोय हे आमचं खरं भाग्य! लिहीत रहा. शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर जी...
      शब्द,तारूण्य व गंध आपल्या प्रसन्नतेबरोबरच वृद्धिंगत होत आहे...फुलते आहे.

      Delete
  9. सर खूप सुंदर कविता आहे ...खरंच आमचे इंग्रजीचे सर एवढी सुंदर मराठी कविता लिहतात असे वाटलेच नाही......sir you are always best....my teacher is the best best teacher in the World..........Dr. sheetal M Randhir

    ReplyDelete
  10. वाह! सर खूप सुंदर,अप्रतिम प्रेम कविता आहे.

    ReplyDelete
  11. Great...I m surprised...Great personified..

    ReplyDelete
  12. अप्रतीम सर ��

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS