Labels

Monday, October 12, 2020

प्रेम-हृदय

प्रेमात कधी असं ठरवायचं असतं का?

तु माझ्यावर किती प्रेम करायचंस.!!

अन् मी तुझ्यावर कसं प्रेम करायचं...!!

खरंतर...दोघांनी फक्त प्रेम निभावयाचं असते!!


प्रेमात पडताक्षणी सहज काय ठरत असते?

रुसायच काम फक्त तुझ्या, तुझ्याकडेच असेल..!

अन् भांडायचा हक्क मात्र मला, मला कधीच नसेल..!

पण...दोघांनीच मिळून प्रेम जपायचे असेल.


प्रेमाच्या सुरुवातीला काय काय ठरलेले असते?

आवड तुझीच प्राणप्रिये, मी जपायची असते...

नावड माझ्या प्राणनाथा, तु सहज सोडायची असते...

होय...दोघांनी मिळून प्रेम जगायचे असते.!!


प्रेम फुलवताना काय काय ठरवायचं असते?

तिला भांडण तुझ्याशी मुद्दाम का करायचं असते...!

त्याचं समजावून सांगणे तिला भन्नाट वाटत असते....!

खरंच... दोघांनी मिळूनच प्रेम टिकवायचे असते.!!


प्रेम शिखरावर असताना काय करायचे असते?

ह्रदयात तिच्या, तु आनंदाने वसायचे असते.

तिला हृदयात सख्याच्या निखळ रमायचे असते.

आणि...दोघांनी केवळ हृदयप्रेम खुलवायचे असते!!!

-सुनील पंडित.


32 comments:

  1. You have described unconditional love very precisely.

    ReplyDelete
  2. प्रेम दोघांनी निभावयाचे,जपायचे,जगायचे,टिकवायचे आणि खुलवायचे छानच शब्दबध्द केलेआहे.

    ReplyDelete
  3. खूपच छान , कधीही न संपणार प्रेम अस असू शकत

    ReplyDelete
  4. Replies
    1. *प्रेम* ही अशी गोष्ट आहे की ते आपण कुणावरही करू शकतो. अणि आपण जर समोरच्यावर प्रेम केले तर ते पण आपल्यावर तितकेच प्रेम करते.मग तो माणूस असो की प्राणी.
      *'' म्हणुनच म्हणतात प्रेमाने जाग पण जिंकता येते ''*

      Delete
  5. तुमची कविता म्हणजे प्रेमाविषयी सर्व काही... अशी आहे. प्रेम ही भावनाच अशी आहे की कितीही लिहिलं , बोललं , व्यक्त केलं तरी दशांगुळं शिल्लक राहते.खूप छान रचना.
    रामदासी पु. रा.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद सर जी.

      Delete
  6. Replies
    1. खूपच सुंदर कविता वा छान

      Delete
  7. खूपच छान कविता आहे.

    ReplyDelete
  8. खुप सुंदर कविता..हृदयस्पर्शी....प्रेम म्हणजे दोन जिवांमध्ये असलेलं एक निर्मळ नात..

    ReplyDelete
  9. सुंदर ह्रदय निर्मळ नात्यांमध्ये जीव ओततात व कविता जिवंत होते.मनस्वी धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. हे आपण अगदी योग्यरीत्या आपल्या कवितेतून मांडले आहे. खरचं खूप सुंदर सर..👌

      Delete
  10. Replies
    1. Thanks Dilip bhau..
      Due to unknown status..late to mention.

      Delete
  11. Wow, very nice narrated the true love.
    Superb 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  12. Sir, never imagined a love poet in you. Liked the earlier verses and versions more though...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much.
      A Poet loves poetry.
      Thanks.

      Delete
    2. Well replied....now this is truly poetic...

      Delete

Blog Canvas

GOD'S SMS