Labels

Sunday, October 25, 2020

सीमोल्लंघन मनाचे

ऋतु-रंग मान्सुन आक्रमितो प्रवास परतीचा,

अवखळ आक्टोबर वाढवतो काळ दिवसाचा,

मृदुगंध मधाळ, ढगाळ गडगडाटी आभासाचा.


मुक्त लहरी हवा, बाष्पी चक्रिय वारा,

तेज-पाती शलाका प्रीत करी तृषार्त धरा,

धरती अनुभवे उत्साही सुदत्त निसर्ग नजारा.


धुंद पखरण हिरवळीची जशी मखमल रानावना,

चातक-मन वाट पाहे जणु सहज एकरुप भावना,

वाहता पाऊस-पाणी, खोल ओलावा येईल राना.


उन्नत उसळती अगणित स्वप्न देव-कारंजी,

बरसती मुक्त ईश्वरी-धारा रिमझिम रात्रं दिवशी,

भिजवती चिंबचिंब सुंदर लोभस रुप सर्वांगीं.


सप्तमीचा कडक फुलोरा उदो उदो महाशक्तीचा,

अष्टमी-नवमीचा जागर, उत्सव तव महाभक्तीचा,

दशमीचा विजय प्रगटे अथांग अवकाश प्रतिमांचा.


स्वच्छंद मन शोधते भाव बंध सीमारेषांचे,

नव-श्वासाचे,नव-संकल्पनांचे,नव-स्पुलिंगांचे !

सृजन हे घडवते, सीमोल्लंघन मनामनांचे !!!

-सुनील पंडित.


16 comments:

  1. अगदी सुंदर निसर्गचित्र! मानवी मनाचे प्रतिबिंब..

    ReplyDelete
  2. खूपच छान जमून आलीय रचना. शब्दांची निवड करताना बरंच भान राखलेलं जाणवतंय. त्यामुळं रचनेला एक अंतर्लय लाभलीय. नवरात्रीचा उत्सव आणि निसर्गाची सांगड उत्तम. मानवी मनही सीमोल्लंघन करतं ही कल्पना चपखल बसलीय. छान.
    --- रामदासी पु.रा.

    ReplyDelete
  3. Poem is a quality blend of golden words designed comprehensively and glorifying Indian festival.

    ReplyDelete
  4. Khupach sundar! Apratim kavita! -Dilip G.

    ReplyDelete
  5. Very nice sir.
    Having supreme quality.

    ReplyDelete
  6. Nisarga aani manache bhavtarang sanskrutichya saptarangat chhan umatalet....must aahe kavita..

    ReplyDelete
  7. छानच कविता आहे सर.निसर्गाचेअतिशय बारकाईने निरीक्षण केले आहे.मानवी मनाची गुंतागुंत अगदी सफाईने शब्दबद्ध केली आहे.एकदम मस्त कविता आहे.
    बनकर सर

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS