Labels

Saturday, November 21, 2020

TAG-S-TORY : 18

तिचे लोभस डोळे सैरभैर होऊन काळजीने अस्वस्थ वाटायचे. घरातील तिचा वावर काही दिवसांपासून थोडा सकुंचित झाल्यासारखा वाटायचा. तिची बोलकी शोधक नजर मनाला हुरहूर लावत होती. सर्वांना तिची अस्वस्थता कळत नव्हती असं नाही. तिची ती डौलदार मोहक चाल आता थोडी जबाबदारीची वाटत होती. काही दिवसांतच हे चित्र बदलले. आयुष्यातील प्रथम हूरहूर अस्वस्थता आणि परममत्वाचे अमृतमयी सुख, ती आज अनुभवत होती, कारण आता सर्वांची लाडकी मनी माऊ-ली झाली होती.

-सुनील पंडित.


29 comments:

  1. मातृत्व म्हणजे जबादारी, निर्मिती एक अत्युच्च कोटीची भावना...

    ReplyDelete
  2. Stree chya aaushyatil mahatvacha kshan...aani matrutvachi chahul...👌

    ReplyDelete
  3. Motherhood is divine naturally. Very nice story revealing good news.👌

    ReplyDelete
  4. लेखनाचा खूप छान प्रकार. कमी शब्दात जास्त कथा लपलेली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक आभार... टॅगस्टोरी हा नविन जाॅनर् वाचकांना संधी देतो.

      Delete
  5. वा...झकास. लाडक्या मनीमाऊवर किती गोड लिहिलं. छान...
    --पु. रा. रामदासी.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर...
      माऊ-ली सर्व गोड करवून घेते.

      Delete
  6. कथा खुपच छान आहे.मनीमाऊचा तारुण्याचा अल्लडपणा मातृत्वाने एकदम जबाबदारीची जाणीव करून दिली.
    कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कथेत व्यक्त केला.छानच कथा.
    प्रा दिपक बनकर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर...
      कथेचे कौतुक छान अनुभव वाटतो आहे.

      Delete
  7. अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन केलेले आहे. मातृत्व भावना सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केली आहे.
    डॉ. पंकज शिंपी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद डाॅ.शिंपी सर...
      छान शब्दांची अप्रतिम प्रतिक्रिया...

      Delete
  8. खुपच सुंदर सर जी 👌👌

    ReplyDelete
  9. वेगळी कल्पना आणि सुंदर मांडणी

    ReplyDelete
  10. Great observation as a writer. So well described the beautiful moments and responsibilities of motherhood.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS