बावरी राधा,
...कृष्णप्रेम बाधा.
कावरी राधा,
...मनी कृष्णसखा.
माखन चोर,
...चित्त चकोर.
अबोल तृष्णा,
...ऐकती कृष्णा.
सुरेल पावा,
....मुग्ध रावा.
बासरी चित्शक्ती,
...फुलली प्रेमभक्ती.
मोहन मुरारी,
...ह्दय दूलारी.
आत्म रूखी,
...कृष्ण सखी.
प्रेमविव्हल मन,
...सौभाग्य न धन.
अद्वैत विशाखा,
...मन अनुराधा.
विसरे भान,
...आत्म मिलन.
देह कासरी,
...थांबली बासरी.
त्यागिली मुरली
....वाट स्वर्गी
राधा कोण?
...कोण कृष्णा ?
तत्त्व स्वरुप,
...दोघे एकरूप.
राजस कृष्णा,
...कृतार्थ राधा.
........................................................
©सुनील पंडित, पुणे.
........................................................

कृष्ण सखा..बावरी राधा.. मधुर रचना!😊
ReplyDeleteखूप सुंदर रचना. आध्यात्मिक अंग आहे रचनेत त्यामुळं अर्थपूर्ण झालीय. राधा-कृष्ण हा विषय कितीही लिहिला तरी दशांगुळं शिल्लक राहील असा आहे. खूप छान.
ReplyDelete--- रामदासी.
जय श्री कृष्ण! राधे राधे! 🙏
ReplyDeleteMythological truth in poetic form.
ReplyDeleteMarvelous.
जय श्री कृष्ण जय राधे 🙏🙏
ReplyDeleteTatva swarup doghe ekrup.adhyatma sar. Khup sundar!
ReplyDeleteराधाकृष्ण 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteराधाकृष्ण ��������
ReplyDelete👌🏻👌🏻👍
ReplyDeleteसुंदर काव्य.प्रेम आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम.राधा कृष्ण यांच्यावर कितीही लिहीलं तरी कमीच.छानच .
ReplyDeleteप्रा दिपक बनकर
Nice rendering of thoughts. Use of few words express more of the adwait philosophy. Keep it up.
ReplyDeleteVery nice .Keep it up
ReplyDeleteLimited words, unlimited thoughts and logic.Too good!Nice one Sir!
ReplyDeleteImmortal love, radha-krishna.. So well put up with superb rhyming.
ReplyDelete