Labels

Monday, February 8, 2021

तु मला का कधीच ...?

तुझी गोड छबी सोनचाफा

नधुंद मोहक हिरवा चाफा

लाजते चुरचुर मृग नयनी

काया थरथरे ललना मनी

धी दिसते तांबडा चाफा

धीर मजला पण अनुकंपा

कवते घननीळ मनचंपा

भेट तुझी जशी नागचाफा

वटवीत चंचल अंगछटा

रतरीत तोरा पांढरा चाफा

ना येई भ्रमर इथे गुंजा-रत

हीच घेई शिक्षा तो विषा-रत.


वाचेल प्रथम अक्षर हरेक ओळी,

कळेल रहस्य भ्रमर चाफे कळी.

©सुनील पंडित, पुणे.






36 comments:

  1. अप्रतिम

    ReplyDelete
  2. वेगवेगळ्या चाफा फुलांचे अप्रतिम वर्णन. येथे मला जुन्या 'चाफा फुलेंना, चाफा बोलेना' या सुंदर गाण्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद.
      अर्थात गाण्यात भुंगा का नाही....याचा हा शोध.

      Delete
  3. भेटेल हो भेटेल. एवढे छान छान शब्द वापरल्यावर कां नाही भेटणार...
    --- रामदासी.

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणून सर्व प्रकारचे चाफा समोर(काही प्रकार सोडून)आणले आहेत...

      Delete
  4. अगदी आई - बाबांच्या तारुण्यातील काव्य वाचल्यासारखे झाले. सध्या हे असे 'लाजून हासणे'..वगैरे हद्दपार झाले आहे. पण खूप मस्त!😊👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम...
      मधुकर व चाफा यांचे भावबंध उलगडताना हे रहस्य उमजले.

      Delete
  5. Great skill of making a rich poem . The skill lies in the use of initial word of each line. The first alphabet of each line तू मला का कधीच भेटत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Sir ji....
      I tried the acrostic way of presenting compositional thought..
      Sir ji..
      When your words reach from Chanrdapur to Pune...I profoundly find myself blessed.
      Thanks once again.

      Delete
  6. Replies
    1. मनःपुर्वक धन्यवाद.

      Delete
  7. The essence of poem is felt similar like yellow चाफा flower.

    ReplyDelete
  8. Replies
    1. मनःपुर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  9. Dear Sir, you are rocking and playing with words....... आणि तुमची ती तर आता तुम्हाला सततच भेटत आहे....तक्रार कशाला...शेवटी ती तुमचीच लाडकी झालेली आहे...तुमचीच कविता...!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर..
      चाफा व भुंगा यांच्या रहस्यमय स्नेह-तक्रारीचे रहस्य जुगलबंदीतुन एकमेकांसमोर आले आहे.

      Delete
    2. जुगलबंदी तर खासच आहे सर...!तुमच्या कवितांमधून आमचे मराठीचे शब्द भांडार वाढत आहे. मनापासून धन्यवाद, अभिनंदन.

      Delete
  10. Eloquent writing.. Beautifully expressed with first letter of each line.

    ReplyDelete
  11. अगदी छान जमलीय जुगलबंदी.

    ReplyDelete
  12. चाफा कवितेतून दरवळतोसुगंध

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS