ना समजतंय तुजला
ना उमजतंय मजला
स्पर्श होतो अजाणता
उशिर होतो समजता
नकळत घडतं वेगळं
समजत असुन सगळं
अंतर योग्य न ठेवता..
मास्क नीट न लावता..
हात लागताच कसातरी
व्हायरस गाठतो कुठेतरी
कळून हरतात तारे
शिक्षण हतबल सारे
नसतो कधीच मनात
लपतो हळूच घशात
आणतो गंभीर सरदी
भेटतो फसवा गारदी.
फुफ्फुसे मग निकामी
शहरे उजाड रिकामी
अजिबात नको गर्दी
यमराजा देईल वर्दी.
© सुनील पंडित पुणे.

आजच्या वर्तमानात अचूक संदेश!👌👌👍👍
ReplyDeleteVery nice poem Sir.
ReplyDeleteKeep it up.👌👍
Karona message is given by u to the citizens through the nice poem.
ReplyDeleteसुटसुटीत व परिणाम साधणारी कविता ..
ReplyDeleteछान आहे ..
नेमका संदेश. 👌🙏👍
ReplyDeleteहा संदेश सर्वत्र व्हायरल झाला पाहिजे. लोक कदाचित शिकतील... थोडं तरी. छान रचना.
ReplyDelete--- रामदासी.
खुप परिणामकारक व तितकाच भीती निर्माण करून थेट पोहोचवणारा संदेश. गारदी शब्दाचा अचूक वापर. छान सर!
ReplyDeleteNeed of Time...
ReplyDeleteHealthier msg....for everyone"👌
खूप छान सर
ReplyDeleteखुप सुदंर
ReplyDeleteमस्तच...
ReplyDeleteखुपच छान कविता आहे, परिणाम कारक कविता.
ReplyDeleteबनकर सर
Wonderful message for this tough time.. Let's stay strong and fight covid19.
ReplyDeleteAbsolutely Apt!!!
ReplyDelete