Labels

Monday, March 1, 2021

ना समजतंय तुजला...

ना समजतंय तुजला    

ना उमजतंय मजला     


स्पर्श होतो अजाणता 

उशिर  होतो समजता


नकळत घडतं वेगळं 

समजत असुन सगळं 


अंतर योग्य न ठेवता..

मास्क नीट न लावता..


हात लागताच कसातरी

व्हायरस गाठतो कुठेतरी


कळून हरतात तारे

शिक्षण हतबल सारे


नसतो कधीच मनात

लपतो हळूच घशात


आणतो गंभीर सरदी

भेटतो फसवा गारदी.


फुफ्फुसे मग निकामी

शहरे उजाड रिकामी


अजिबात नको गर्दी

यमराजा देईल वर्दी.

© सुनील पंडित पुणे.



14 comments:

  1. आजच्या वर्तमानात अचूक संदेश!👌👌👍👍

    ReplyDelete
  2. Karona message is given by u to the citizens through the nice poem.

    ReplyDelete
  3. सुटसुटीत व परिणाम साधणारी कविता ..
    छान आहे ..

    ReplyDelete
  4. नेमका संदेश. 👌🙏👍

    ReplyDelete
  5. हा संदेश सर्वत्र व्हायरल झाला पाहिजे. लोक कदाचित शिकतील... थोडं तरी. छान रचना.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  6. खुप परिणामकारक व तितकाच भीती निर्माण करून थेट पोहोचवणारा संदेश. गारदी शब्दाचा अचूक वापर. छान सर!

    ReplyDelete
  7. Need of Time...
    Healthier msg....for everyone"👌

    ReplyDelete
  8. खुपच छान कविता आहे, परिणाम कारक कविता.
    बनकर सर

    ReplyDelete
  9. Wonderful message for this tough time.. Let's stay strong and fight covid19.

    ReplyDelete
  10. Absolutely Apt!!!

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS