Labels

Monday, March 22, 2021

निसर्गाचं पान

आंब्याची निमुळती पानं,

          सजती प्रवेश द्वार तोरणं.

आपट्यांची कर्णगोल पानं,

          लुटती विजय मनी कांचन.

लिंबाची कडवट पानं,

          डोलवी उंच गुढीचे खांब.

नागवेली कळीदार पान,

          मिळवती विड्यांचा मान.

पिंपळाची देठ पानं,

          तरूण ठेवते ती आठवण.

केतकीची मोहक पानं

          मिरवते सुंदरी प्रेमळ छान.

मांदार रुईची पानं

         मारूती रामभक्ती जाण.

देवकथा पोथीचे पान,

         देई आत्म अध्यात्म वाण.

अभ्यास असे पुस्तक पान,

         बनते यशाचे हूकमी पान.

 कर्म सेवा ठरते अमृतपान,

         वेळ ठरवते पिकलं पान.

@ सुनील पंडित, पुणे.



22 comments:

  1. Ati sundar Sir..... Khup creative rachna.....

    ReplyDelete
  2. पानांची विलोभनीय सळसळ!😊👌👌

    ReplyDelete
  3. खुप सुंदर ��

    ReplyDelete
  4. Amazingly , A simple leaf can be a topic for your poetry ...!!!!!

    ReplyDelete
  5. सुंदर खुपच सुंदर

    ReplyDelete
  6. पानाचा विडा
    जमला छान!

    ReplyDelete
  7. कमाल आहे ! खूपच सुंदर!

    ReplyDelete
  8. पानाचं हे वेगवेगळे रूप, खूप छान वर्णन

    ReplyDelete
  9. पानाचं हे वेगवेगळे रूप, खूप छान वर्णन

    ReplyDelete
  10. सुंदर...अप्रतिम...👌👌

    ReplyDelete
  11. From various dimensions of Nature's leaf to turning over a new leaf through knowledge and karma's cause and effect, it's a beautiful thought! Also the
    representative pic of leaf art is awesome. Thank you sir. ��

    ReplyDelete
  12. व्वा सर...पानांचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणारी खूप सुंदर रचना. मुळात ही संकल्पनाच मनोज्ञ आहे. अशा कल्पना सुचणं हे उत्तम सर्जनशीलतेचं लक्षण आहे.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  13. Deep thought about every leaf and it's importance in our life..

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS