आंब्याची निमुळती पानं,
सजती प्रवेश द्वार तोरणं.
आपट्यांची कर्णगोल पानं,
लुटती विजय मनी कांचन.
लिंबाची कडवट पानं,
डोलवी उंच गुढीचे खांब.
नागवेली कळीदार पान,
मिळवती विड्यांचा मान.
पिंपळाची देठ पानं,
तरूण ठेवते ती आठवण.
केतकीची मोहक पानं
मिरवते सुंदरी प्रेमळ छान.
मांदार रुईची पानं
मारूती रामभक्ती जाण.
देवकथा पोथीचे पान,
देई आत्म अध्यात्म वाण.
अभ्यास असे पुस्तक पान,
बनते यशाचे हूकमी पान.
कर्म सेवा ठरते अमृतपान,
वेळ ठरवते पिकलं पान.
@ सुनील पंडित, पुणे.

nice 👌
ReplyDelete👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteWahhh sundar lihilay sir, 👌👌
ReplyDeleteAti sundar Sir..... Khup creative rachna.....
ReplyDeleteपानांची विलोभनीय सळसळ!😊👌👌
ReplyDeleteखुप सुंदर ��
ReplyDeleteAmazingly , A simple leaf can be a topic for your poetry ...!!!!!
ReplyDeleteExcellent creative.
ReplyDeleteसुंदर खुपच सुंदर
ReplyDeleteपानाचा विडा
ReplyDeleteजमला छान!
कमाल आहे ! खूपच सुंदर!
ReplyDeleteपानाचं हे वेगवेगळे रूप, खूप छान वर्णन
ReplyDeleteपानाचं हे वेगवेगळे रूप, खूप छान वर्णन
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteसुंदर...अप्रतिम...👌👌
ReplyDeleteFrom various dimensions of Nature's leaf to turning over a new leaf through knowledge and karma's cause and effect, it's a beautiful thought! Also the
ReplyDeleterepresentative pic of leaf art is awesome. Thank you sir. ��
Apratim kavya
ReplyDeleteNice sir excellent
ReplyDeleteसुंदर ..
ReplyDeleteव्वा सर...पानांचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणारी खूप सुंदर रचना. मुळात ही संकल्पनाच मनोज्ञ आहे. अशा कल्पना सुचणं हे उत्तम सर्जनशीलतेचं लक्षण आहे.
ReplyDelete--- रामदासी.
Deep thought about every leaf and it's importance in our life..
ReplyDelete