Labels

Saturday, March 6, 2021

TAG-S-TORY : 33

Her phone rang again but she avoided his call. She recalled, since childhood, being good friends, yes.. good family friends!... they do chat freely, also share.. joys and sorrows too plausibly. Yesterday, in a flowtalk, he abruptly said that he wanted to talk on a personal issue. Surprisingly, she smiled a lot in sent 'smileys'. As he earnestly said not to smile, as it was really a serious issue !!.. "I had been having a dreadful dream for a few days. A beautiful lady comes in the dream. She entices me, seduces romantically..but she doesn't have a face." I felt a little scared. After a pause, I said it would  be any black spirit, ...just pray to God ... And it would stop automatically. And if you think of someone, so this could happen. He thanked for piece of advice. Sometime later, he called again over a phone saying..he thought over it. And, he saw "her" face  in front of his eyes, but frankly in the dream, it was faceless lady!!!

While telling this, a genuine sad squall of losing the childhood friend, left many brute scratches on her serene face.

© Sunil Pandit, Pune.

टॅग स्टोरी : ३३

त्याचा पुन्हा फोन आला पण तो अटेंड करायची तिची इच्छा अजिबात नव्हती. लहानपणापासून दोघे एकमेकांना ओळखायचे, तसा तो फॅमिली फ्रेंड च! मनमोकळ्या गप्पा मारणं, सुख-दुःख शेअर करणं.. अगदी साहजिक. काल विचारपूस झाल्यावर, त्याने अचानक म्हटलं, तुझ्याशी पर्सनल बोलायचे आहे. आश्चर्याने 'स्माईलीमध्ये' ती बरीच हसली तसा तो म्हणाला, हसु नकोस, रियली..ईटस् अ सिरीयस थिंग!!  काही दिवसांपासून एक स्वप्न पडतंय... स्वप्नात एक सुंदर स्त्री येते..खुप जवळ येते, ती सलगी साधते पण तिला चेहराच नसतो. मला थोडी भिती वाटली. मग तिने म्हटले..अरे, ब्लॅक स्पिरीट वगैरे असेल, देवाची प्रार्थना कर...थांबेल सारं आपोआप!आणि जर कुणाचा, तु विचार करीत असशील, तर असे घडू शकते. तो धन्यवाद म्हणाला. थोड्या वेळाने त्याने फोन केला. तु म्हणतेस तसा खुप विचार केला ... तर तुझाच चेहरा समोर येतो पण स्वप्नात मात्र "तिला" चेहराच नसतो.

हे सांगताना बालमित्र गमावल्याचा आक्रोश, तिच्या सुंदर निष्पाप चेह-यावर ओरखडे उमटवत होता.

© सुनील पंडित, पुणे.



8 comments:

  1. जन्म गाठी या परमेश्वराने ज्याच्या त्याच्या जन्मा पासून बांधलेल्या ठेवलेल्या आहेत त्या जीवनात पूर्ण झाल्यातर जीवन आनंदमय नाहीतर दुःखमय होते हीच सत्यता स्वीकारावी लागते.

    ReplyDelete
  2. Another gem, loved the friendly love!Very well worded....I hope she reciprocates after the clue.

    ReplyDelete
  3. सर , तुमच्या लेखनाची वाटचाल हळूहळू "कथा-लेखन" या प्रकाराकडं होत आहे असं मला तरी जाणवू लागलंय. खूप छान. विषय, शब्दांची निवड वै. छान... छान. करा सुरवात कथेला. शुभेच्छा.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  4. स्वप्नात चेहरा नसणे, खूप काही सांगून जाते. आपण कुणालाही अशी फसवी स्वप्नं सांगू नये. मैत्री म्हणजे विश्वास. अशा भंपकपणाचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे.

    ReplyDelete
  5. Your story reflects fluctuated mind between peace and peacelessness;love and conflict,knowledge and ignorance;agony and ecstasy. Keep writing ✍

    ReplyDelete
  6. निसटलेले क्षण आपला पाठलाग करतच राहतात... अव्यक्त भावना स्वप्नात तरी व्यक्त होऊ पाहतात.... आशा निराशांसहित नात्यांचं वर्तुळ पूर्णत्वाकडे नेत असताना आयुष्याच्या परिघावर घालमेल तर होणारच.... तिला कलात्मकरित्या मोकळं करून सामूहिक धारणेला अचूकपणे शब्दबद्ध केलत सर. छानच..!

    ReplyDelete
  7. लघुकथेची Theme छान वाटली ..
    तुमचे शब्दभांडार अचूक आहे ...

    ReplyDelete
  8. "faceless lady" beautiful expression indeed

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS