Labels

Monday, September 14, 2020

विसरत जावं सहज......!!

विसरत जावं सहज...

सांगण्यासारखे सर्व काही.

खुपदा हरवून जाते,

ते सहज सर्व काही...

खुप खुप खोलवर कुठेतरी...

विरून जातात मग आवेगावेग,

ओठांवरील शब्द बनण्यापुर्वी..

काही साद मिळण्यापुर्वी...!


विसरत जावे सहज...

आठवण्यासारखे सर्व काही.

बहुदा गुंतवून टाकते,

जे सहज सर्व काही.

खुप खुप दुरवर कुठेतरी...

धूसर होतात जी स्वप्न-स्वप्ने,

हुंदक्यांचे तरंग उमटण्यापुर्वी,

लहरींचे वर्तुळ दिसण्यापुर्वी..!


विसरत जावे सहज...

विसरण्यासारखे सर्व काही.

खुपदा रमवुन टाकते, 

जे सहज सर्व काही,

खुप खुप उंच कुठेतरी...

बेधुंद होतात मग नजरा,

अश्रूंचा ओलावा सुकण्यापुर्वी,

तरल भावना कळण्यापुर्वी...!


करावे ते सहज...सर्व काही.

मनासारखे ते...अजूनही काही.

शब्दांना साद मिळण्यासाठी,

तरंग-वर्तुळ पूर्ण होण्यासाठी,

अश्रूंचा अर्थ कळण्यासाठी,

हृदयाचा ठाव जाणण्यासाठी,

सागरी अथांगपणा पाहण्यासाठी..!

लाटांचा आवेग अनुभवण्यासाठी..!!

-सुनील पंडित

12 comments:

  1. कविता मनातील व्याकुळतेला, कोलाहलाला साद घालत शांत करणारी.

    ReplyDelete
  2. Khupach chhan ....Manatil tarangache vartul purna hotana chhan anubhuti deun jate...

    ReplyDelete
  3. कवितेतून रसिकता खूप छान मनाला भावते,


    मस्त, खूपच छान

    ReplyDelete
  4. विसरून जावं सहज म्हणता, वाचताना सर्वच आठवणी जाग्या झाल्या सर. छानच कविता.सुंदर काव्य

    ReplyDelete
  5. पंडित सर , झकास जमून आलीये रचना. सहज शब्द असला तरी हे सहजासहजी जमत नसतं. आतून भावना उमलून याव्या लागतात शब्द वेचण्यासाठी. तेच शब्द अचेतनाला चेतना देतात वाचणा-याच्या अंतरंगात. खूप छान. लिहिते राहा.
    रामदासी पु. रा.

    ReplyDelete
  6. खुप खुप धन्यवाद सर...

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS