Labels

Monday, September 21, 2020

स्टेडि "यम"

देवा, तुला रे का इतकी घाई झाली?

मनासारखं चालू होतं ना सगळं तुझ्या..!

मग का बरे तु.. अचानक हातघाईवर आलास?

अन् एकदम खेळच बदलून टाकलास!

करून बघ असे, असं कुणी म्हटलं होतं का तुला?

समजलयं आता...आमच्या सारखंच तुला ..

पाहिजे होतं सगळे, सगळे काही...फास्ट फास्ट!

अरे...आम्ही चुकलो...पण म्हणुन तु सुध्दा..!

तुझ्यासारख्याने पण.. तसंच चुकायचं का देवा?


खरंच कसोटीचा सामना सर्वांनाच आवडायचा,

चांगल्या 'बाॅल'ची खुप वेळ वाट पाहुन आम्ही,

कधीतरी एकदा चौका-छक्का मारायचो...!

वन-डे आली आणि मग त्या टार्गेटवर खेळून, 

फक्त पन्नाशींमध्ये एक दिवसीय जीवनानंद गाठला.

मग आली दिमाखात, खुळखुळणारी झटपट २०-२०.

तुझे वीस. अन् ..माझे वीस, अन् धावांची लयलूट.

इथली बाउंन्ड्री तर स्टेडि"यमा"ने चक्क गायबच केली.

कोण खेळतयं तिथं.. हे अजिबात समजेनासे झाले.

किर्र-केट आलं आणि 'बाॅल'चाच गेम झाला.

कोण चुकलं रे देवा इथं.. तुच सांग ना आता.!!

-सुनील पंडित

                 

23 comments:

  1. खुपच छान... अप्रतिम कविता सर

    ReplyDelete
  2. अगदी सर्वांचे मनोगत..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम.एक प्रयत्न केला आहे.

      Delete
  3. बनकर सर - विज्ञान युगात सर्वांना सर्व रेडिमेड आणि लवकर मिळत गेले . सर्व लवकर मिळवायच्या घाईत देव निसर्ग नियम धाब्यावर बसवून ठेवले.मग आता देवाला घाई होणार, असं वाटतंय. छानच कविता सर.

    ReplyDelete
  4. नविन विषयावर व्यक्त होणं हे लेखकाचं वैशिष्ट्य असतं. कविता असो वा लेख. छान.
    --रामदासी पी.आर.

    ReplyDelete
  5. अतिशय मार्मिक आणि परीस्थितीनुरुप , छान

    ReplyDelete
  6. किती विदारक सत्य परिस्थिती मांडली सर.! आतुन आलेली हेलावून टाकणारी कविता!

    ReplyDelete
    Replies
    1. हृदयश:धन्यवाद...सर जी.

      Delete

Blog Canvas

GOD'S SMS