देवा, तुला रे का इतकी घाई झाली?
मनासारखं चालू होतं ना सगळं तुझ्या..!
मग का बरे तु.. अचानक हातघाईवर आलास?
अन् एकदम खेळच बदलून टाकलास!
करून बघ असे, असं कुणी म्हटलं होतं का तुला?
समजलयं आता...आमच्या सारखंच तुला ..
पाहिजे होतं सगळे, सगळे काही...फास्ट फास्ट!
अरे...आम्ही चुकलो...पण म्हणुन तु सुध्दा..!
तुझ्यासारख्याने पण.. तसंच चुकायचं का देवा?
खरंच कसोटीचा सामना सर्वांनाच आवडायचा,
चांगल्या 'बाॅल'ची खुप वेळ वाट पाहुन आम्ही,
कधीतरी एकदा चौका-छक्का मारायचो...!
वन-डे आली आणि मग त्या टार्गेटवर खेळून,
फक्त पन्नाशींमध्ये एक दिवसीय जीवनानंद गाठला.
मग आली दिमाखात, खुळखुळणारी झटपट २०-२०.
तुझे वीस. अन् ..माझे वीस, अन् धावांची लयलूट.
इथली बाउंन्ड्री तर स्टेडि"यमा"ने चक्क गायबच केली.
कोण खेळतयं तिथं.. हे अजिबात समजेनासे झाले.
किर्र-केट आलं आणि 'बाॅल'चाच गेम झाला.
कोण चुकलं रे देवा इथं.. तुच सांग ना आता.!!
-सुनील पंडित
Very nice
ReplyDeleteKhup sanvedanseel🙏
ReplyDeleteThank you
Deleteखुपच छान... अप्रतिम कविता सर
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteअगदी सर्वांचे मनोगत..
ReplyDeleteधन्यवाद मॅडम.एक प्रयत्न केला आहे.
Deleteबनकर सर - विज्ञान युगात सर्वांना सर्व रेडिमेड आणि लवकर मिळत गेले . सर्व लवकर मिळवायच्या घाईत देव निसर्ग नियम धाब्यावर बसवून ठेवले.मग आता देवाला घाई होणार, असं वाटतंय. छानच कविता सर.
ReplyDeleteधन्यवाद बनकर सर
DeleteVery nice
ReplyDeleteनविन विषयावर व्यक्त होणं हे लेखकाचं वैशिष्ट्य असतं. कविता असो वा लेख. छान.
ReplyDelete--रामदासी पी.आर.
धन्यवाद सर जी.
Deleteअतिशय मार्मिक आणि परीस्थितीनुरुप , छान
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteकिती विदारक सत्य परिस्थिती मांडली सर.! आतुन आलेली हेलावून टाकणारी कविता!
ReplyDeleteहृदयश:धन्यवाद...सर जी.
Deleteखूपच छान.
ReplyDeleteखुप धन्यवाद...
ReplyDeleteखुप छान कविता सर
ReplyDeleteThank You Mm
DeleteBeautiful poem sir
ReplyDeleteThank you very much.
ReplyDeleteTruly apt title !!!
ReplyDelete