Labels

Monday, April 19, 2021

भेट लाॅक्-डाऊन...!!

भेट कधी ना तिच्या स्वप्नी

ना भेट कधी याच्या मनी

का कधी कसे काय घडते

कुणाला कधी तरीच कळते.


ओझरत्या प्रेम नजर अदा,

नेत्र कटाक्ष प्रियतम सदा,

घडते कसे कोई न जाने?

अर्थ न उमजे दिवस महिने.


दूरदूर असता बहरती नाती,

हुरहूर अस्वस्थता ना भेटी,

अस्तित्व भासे ओठांवरी.

पंचप्राण दिसे प्रीत उरी.


स्वप्न-रंजन रम्य अनुभवे,

मयूर-पंखी स्पर्श न गमवे.

क्षण एक मोठा सुखाचा,

सुंदर मिलन जीव प्रेमाचा.

© सुनील पंडित पुणे.




11 comments:

  1. अप्रतिम सर ��

    ReplyDelete
  2. Nice words ,nice theme ,nice poetic diction ,nice use of imagery to visualize the incidents or picture !Keep it up !🌹🌹🍫

    ReplyDelete
  3. It's unique way of being positive by mind instead of dark perception of lockdown .

    ReplyDelete
  4. अप्रतिम सद्यस्थितीतील प्रेमाची, विरहाची अभिव्यक्ती. सकारात्मकतेचा उद्घोष आणि कृतीशीलतेची जोड. छान सर!

    ReplyDelete
  5. अतिशय सुरेख

    ReplyDelete
  6. आवडली सकारात्मक रचना.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  7. Waah!! Very nice poem sir! Excellent theme

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS