भेट कधी ना तिच्या स्वप्नी
ना भेट कधी याच्या मनी
का कधी कसे काय घडते
कुणाला कधी तरीच कळते.
ओझरत्या प्रेम नजर अदा,
नेत्र कटाक्ष प्रियतम सदा,
घडते कसे कोई न जाने?
अर्थ न उमजे दिवस महिने.
दूरदूर असता बहरती नाती,
हुरहूर अस्वस्थता ना भेटी,
अस्तित्व भासे ओठांवरी.
पंचप्राण दिसे प्रीत उरी.
स्वप्न-रंजन रम्य अनुभवे,
मयूर-पंखी स्पर्श न गमवे.
क्षण एक मोठा सुखाचा,
सुंदर मिलन जीव प्रेमाचा.
© सुनील पंडित पुणे.

अप्रतिम सर ��
ReplyDeleteNice words ,nice theme ,nice poetic diction ,nice use of imagery to visualize the incidents or picture !Keep it up !🌹🌹🍫
ReplyDeleteIt's unique way of being positive by mind instead of dark perception of lockdown .
ReplyDeleteवाह!👌
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteVery nice,sir👌👍💐
ReplyDeleteअप्रतिम सद्यस्थितीतील प्रेमाची, विरहाची अभिव्यक्ती. सकारात्मकतेचा उद्घोष आणि कृतीशीलतेची जोड. छान सर!
ReplyDeleteअतिशय सुरेख
ReplyDeleteआवडली सकारात्मक रचना.
ReplyDelete--- रामदासी.
Waah!! Very nice poem sir! Excellent theme
ReplyDelete